राजकारण

मनोजकुमार ठाकुर यांची केज तालुका भाजपच्या उपाध्यक्ष पदी निवड

केज:~ तालुक्यातील आडस येथील मनोजकुमार उर्फ नितिनसिंह कुंदनसिंह ठाकुर यांची शनिवारी (दि.१९) रोजी भारतीय जनता पक्षाच्या केज तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यातून अभिनंदन केले जात आहे.
अंबाजोगाई शहरातील आमदार नमिता मुंदडा यांच्या अंबाजोगाई येथील निवासस्थानी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, पनगेश्वर कारखान्याचे चेअरमन अक्षय  मुंदडा, केज तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत मनोजकुमार उर्फ नितिनसिंह ठाकुर यांना पक्षाच्या केज तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले. निवडीनंतर बोलताना मनोजकुमार ठाकुर म्हणाले, राज्याच्या पर्यावरण व पशूसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ. प्रितम मुंडे व आमदार नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली भाजप  पक्षाचे विचार समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून पक्ष संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या निवडीच तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यातून अभिनंदन केले जात आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button