सामाजिक

“पत्रकारितेचे तीन तोंडं : जबाबदार, बेजबाबदार आणि थर्ड क्लास!”

तुमच्या खिशात प्रेस कार्ड आहे की रेट कार्ड?

पत्रकारिता हा एक काळा-पांढरा खेळ राहिला नाही आता. इथे सगळ्या छटा आढळतात – काही शुभ्र, काही धूसर आणि काही तर डबक्यातून सरळ रंगवलेली! बेरक्या गेल्या तीन दशकांपासून हे सगळं बघतोय… आणि आज थेट बोट ठेऊन सांगतोय पत्रकारितेचे आजकाल तीन प्रकार झालेत. चला, उघडं करू या या तिन्ही वर्गांचं पान

१. जबाबदार पत्रकारिता – ‘खमकी’, पण शहाणी !

हे लोक खरी पत्रकारिता करतात, कारण त्यांना समाजाचं भान आहे. यांच्यासाठी ‘ब्रेकिंग’पेक्षा ‘वेरिफायिंग’ महत्त्वाचं. कुणावरही आरोप करताना ते समोरचं मत घेतात. बातमी ही ‘फॅक्ट’च्या बोर्नव्हिटाने ताकदलेली असते. अशी मंडळी खरंतर समाजासाठी ऑक्सिजनसारखी आहेत, पण त्यांना व्हायरल होण्यासाठी टीआरपीचं ऑक्सिजन सिलिंडर लागंत नाही.

२. बेजबाबदार पत्रकारिता – ‘दिसलं की फेकलं!’

हे लोक टीआरपीच्या धुंदीत ‘तफावत’ आणि ‘खोटं’ यातला फरक विसरतात. खात्री न करता बातम्या देणं म्हणजे त्यांचा प्राणायाम. “कसली काय माहिती, फॉरवर्ड आली ना, बातमी झाली!” असा त्यांचा फंडा. ‘पाणीपुरीच्या पाण्यात कोरोना’सारख्या बातम्या टाकून हे मंडळी समाजात भीतीचं खैरात वाटतात. ना शोधनिबंध, ना फॅक्टचेक – फक्त ‘शॉक’ इज द की !

हे पत्रकार नाहीत, हे ‘हॅशटॅग वाले हल्लेगार’ आहेत ! कुणीतरी म्हणालं की ‘पेट्रोलमधून बकरी जन्मली’ – तर ही मंडळी त्या बकरीचा फोटो एडिट करून पहिल्या पानावर छापतात

३. थर्ड क्लास पत्रकारिता – ‘बातमीसाठी बाप पण विकतील!’

इथे पत्रकारिता म्हणजे व्यवसाय नव्हे, व्यवहार आहे. ५०० दिलं तर कव्हरेज, १००० दिलं तर हेडलाईन! चाटूगिरी ही इथली आर्टफॉर्म आहे. चांगल्या पत्रकारांचं बदनाम करणं, रात्रीच्या पार्टीत जाऊन ‘संधी’ मिळवणं आणि दिवसा सोशल मीडियावर मीच किती शहाणा हे दाखवणं – ही थर्ड क्लास मंडळींची ठरलेली रुटीन. येलो जर्नालिझमची कमाल म्हणजे पत्रकारिता ‘विक्रारिता’ बनते.

‘पार्ष्या, पेज थ्री, पिठासाखर आणि पोटभरून कव्हरेज’ – हेच यांचं चक्र.

ज्यांनी खरं मोकळं लिहिलं, त्यांच्यावर पेड पोस्ट्स टाकणं, तक्रारी करणं, आणि सगळी पत्रकारिता ‘मी किती शहाणा’ यात अडकवणं – हे त्यांचं प्रोफेशनल हत्यार.

बेरक्याच्या नजरेत अशांना एकच विशेषण आहे –

“हे पत्रकार नाहीत, हे जाहिरातीतून आलेले जोकर आहेत!”

शेवटची बोच…

हे तिन्ही प्रकार बघताना बेरक्या विचारतो –

“पत्रकारिता करताय की ‘पत्र-कारित’ करताय?”

तुमच्या खिशात प्रेस कार्ड आहे की रेट कार्ड?

बातमी विकता की जनतेचं भान जपताय?

ज्यांना वाटतं बेरक्या फारच तिखट बोलतोय – त्यांना सांगतो, “बातमी खोटी असेल, तर बोचट बोलणं खरं वाटायला हवं!”

बाकी, खरी पत्रकारिता करणाऱ्यांना बेरक्याचा सलाम कायम आहे. आणि थर्ड क्लास मंडळींवर बेरक्याची नजर कायम दुर्बीण लावून आहे !

बाकी पत्रकारिता करताय की ‘डील’ करताय, हे ज्याचं त्यानं ठरवायचं !

-बेरक्या ​​नारद यांच्या वालवरुन साभार

(चांगल्या पत्रकारांचा साथीदार, बदमाश पत्रकारांचा कर्दनकाळ)

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button