क्राईम

कत्तलखान्यात जाणारी गाईचा टेप्पो पकडला 10लाखाचा मुद्देमाल जप्त केज नेकनुर पोलीसाची संयुक्त कार्यवाही

7 जन अटकेत

केज :- काल दिनांक 09/01/2025 रोजी सायंकाळी 17.30 वा. सुमारास गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, केज ते बीड जाणारे राष्ट्रीय महामार्गावर एक आयशर टेंपो जिचा पासींग क्र.MH-25-U-0394 मध्ये जर्सी गाय, देशी गाय, म्हैस, बैल यांची निर्दयीपणे कोंबुन बीडच्या दिशेने वाहतुक करत जात आहे. अशी माहीती मिळाल्याने आम्ही तात्काळ पोलीस ठाणे केज येथील अंमलदार यांना बातमीची खात्री करुन सदर वाहणावर कायदेशिर कार्यवाही करणेसाठी पाठवुन पोलीस ठाणे नेकनुर येथे संपर्क करुन तेथील अधिकारी व अंमलदार यांना सदरचे आयशर वाहण थांबवणे बाबत कळविले. 18.30 वा. सुमारास केज ते बीड जाणारे रोडवर बरड फाटा येथे पोलीस ठाणे केज व पोलीस ठाणे नेकनूर येथील पथकाने सदरचे आयशर टेंपो थांबवुन पाहणी केली असता सदर आयशर टेंपो मध्ये 05 जर्सी गायी, 01 जर्सी गायीचे वासरु, 01 म्हैस, 01 हल्या, 03 खिल्लारी बैल, 01 देशी गाय, असे एकुण आयशर टेंपोसह 9,42,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन सचिन रामकिसन वाघमारे, पोलीस अंमलदार ब.नं. 1730 यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे केज येथे गुरनं. 16/2025 कलम 11(1) (D) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सह कलम 83,130,177 महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम प्रमाणे एकुण 07 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे केज येथील उमेश बाबुराव आघाव पोलीस हवालदार ब.नं.429 हे करत आहेत.

सदर कार्यवाही मा.श्री. नवनीत कॉवत, पोलीस अधिक्षक सो बीड, मा.श्रीमती चेतना तिडके मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई, मा.श्री. कमलेश मिना, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांचे मार्गदर्शनाखाली श्री. वैभव पाटील, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे केज, श्री. पवनसिंग जंघाळे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे नेकनुर, ग्रे. पोलीस उपनिरीक्षक, मुकुंद शामराव ढाकणे, पोना/1897 राऊत, पोशि/444 ढाकणे, पोलीस ठाणे नेकनूर, पोशि/1730 वाघमारे, पोलीस ठाणे केज यांचे पथकाने केलेली आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button