क्राईम

संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपीना शिक्षा मिळे पर्यत स्वस्थ बसणार नाही खा.रजनीताई पाटील

बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी गुंडगिरीच्या विरोधात एकत्र येण्याची गरज

केज दि.१४ :-  तालुक्यातील सरपंच देशमुख यांची झालेली हत्या वेदनादायी आहे. घटनेच्या सात दिवसानंतरही सर्व आरोपी अटक झालेले नाहीत. जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. आपण संसदेत हा विषय लावून धरू या भावना खासदार रजनी पाटील यांनी व्यक्त केल्या. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची शनिवारी खासदार रजनी पाटील यांनी भेट घेतली. देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन केल्यानंतर रजनी पाटील यांनी आपण देशमुख कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. यातील सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत असे सांगितले. जोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असेही पाटील म्हणाल्या. खासदार रजनी पाटील यांनी तेथूनच बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याशी संपर्क साधला आणि या प्रकरणातील सद्यस्थितीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करा नाहीतर जन आक्रोश थांबणार नाही असे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले. देशमुख कुटुंबाची भेट घेताना खासदार रजनी पाटील यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, काँग्रेस चे जेष्ठ नेते नवनाथ थोटे, हनुमंत मोरे, केज तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रवीण कुमार शेप, महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष मिनाक्षी पांडुळे यांची उपस्थिती होती.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button