सामाजिक

आळंदीतील प्रेमविवाहांचा धक्कादायक ट्रेंड; पळून जाऊन लग्न अन् नंतर घटस्फोट

पळुन जाऊन लग्न केलेले तरुण तरुणी दोन वर्षात वेठबिगारी करत दिसतात...!

 

आळंदी येथे पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी ७०% जोडपी घटस्फोट घेत असल्याचं समोर आलं आहे

वयाचा फायदा घेऊन जिवनभरचा  मागचा पुढचा विचार न करता चैनसुखाचे आश्वासनावर  आळंदी येथे पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी ७०% जोडपी दिलेले आश्वासन न पाळण्यामुळे घटस्फोट घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सोलापूरच्या एका जोडप्याने सहा-सात वर्षे प्रेमसंबंधानंतर लग्न केले, पण लग्नाच्या रात्रीच मुलीने लग्न तोडण्याचा निर्णय घेतला, हे याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे.

अनेक जोडपी घरच्यांना न सांगता आळंदीत पळून जाऊन लग्न करतात. झटपट लग्न लावून देणारी बेकायदेशीर यंत्रणा आळंदीमध्ये कार्यरत आहे. मात्र असा प्रेमविवाह करणाऱ्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचं समोर आलं आहे.

प्रेमविवाह फसण्याची कारणंः

प्रेमविवाह फसण्यामागची कारणे    मुलाची  आश्वासन न पाळणे दारु पिऊन  पत्नीला मारझोड  रात्री उशीरा घरी  येणे दोन्ही कुटुंबातील सामाजिक, आर्थिक,  आणि परंपरांमधील तफावत, मुले झाल्यावर येणारी जबाबदारी कडे दूरलक्ष या गोष्टी कारणीभूत आहेत.

“प्रेमाने पोट भरत नसते. त्यासाठी व्यवहारही लक्षात घ्यावा लागतो. हे व्यावहारिक ज्ञान अनेक जोडप्यांना नसते. समुपदेशक याची जाणीव करून दिली जाते. तेव्हा पळून जाऊन लग्न केलेले जोडपे काही सैशन्सनंतर पुढे एकत्र प्रवास करण्यासाठी तयार होतात- समुपदेशक

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button