सामाजिक

ॲड माधव जाधव यांना अमेरिकेतील विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी बहाल.

अंबाजोगाई:- अंबाजोगाई येथील शिक्षण क्षेत्रामध्ये गेल्या २५ वर्षापासून अविरतपणे वेगवेगळे उपक्रम राबवून शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे जाधव कोचिंग क्लासेसचे संस्थापक तथा छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष ॲड.माधव लिंबाजी राव जाधव यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी या विद्यापीठाची शिक्षण क्षेत्रातील मानद डॉक्टरेट इन एज्युकेशन ही पदवी बहाल करण्यात आली.यामुळे ॲड माधव जाधव हे आता वकिली व्यवसायासोबतच डॉक्टर सुद्धा बनलेले आहेत.
ॲड माधव जाधव हे अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर सारख्या ग्रामीण भागातून उच्चशिक्षित झालेले तरुण असून त्यांचे शिक्षण हे  एम. ए. इंग्रजी बीएड व एलएलबी असे पूर्ण झालेले आहे.ॲड माधव जाधव यांनी लाडझरी ती.परळी वै. येथील नागेश्वर विद्यालय येथे दोन वर्ष सहशिक्षक म्हणून नोकरी केलेली होती.तसेच घाटनांदुर येथे जाधव कोचिंग क्लासेस ची सुरुवात करून २००१ मध्ये अंबाजोगाई येथे जाधव कोचिंग क्लासेसची स्थापना केली व जाधव कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ज्ञानार्जन करण्याचे काम ॲड माधव जाधव यांनी गेल्या २५ वर्षापासून आंबेजोगाई तालुक्यांमध्ये केलेले आहे.जाधव कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीस मध्ये सवलत देऊन अनेक गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा आधार ॲड माधव जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेला आहे . जाधव कोचिंग क्लासेस च्या संचालिका सौ ज्योती जाधव मॅडम तसेच प्रा. संतोष देशमुख सर , प्रा. योगेश तट सर, प्रा. रमेश कुलकर्णी सर,प्रा. श्रीकांत खुणे सर व इतर सर्व सहकारी यांच्या सहकार्याने जाधव कोचिंग क्लासेस हे अविरतपणे अंबाजोगाई मध्ये शिक्षणाची सेवा देत आहेत.
त्याचप्रमाणे ॲड माधव जाधव यांनी जयभारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठानची स्थापना करून जय भारती सेवा प्रतिष्ठान संचलित छत्रपती संभाजी राजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ही सीबीएससी बोर्डाची शाळा अंबाजोगाई येथे सन २०११ पासून सुरू केलेली असून सध्या इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सीबीएससी बोर्डाची शाळा अतिशय चांगल्या पद्धतीने ॲड माधव जाधव हे त्यांचे सहकारी प्राध्यापक सुनील साळुंखे सर, ॲड अनिल लोमटे,जीडी थोरात साहेब,राजू शेठ भन्साळी,आतिक भाई ,ईंजी. परमेश्वरजी भिसे,आर पी चव्हाण सर, ॲड.श्रीनिवास अंबाड, ॲड.बाळासाहेब अंबाड, ईशरत मोमीन मॅडम व इतर सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने अतिशय उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देऊन अंबाजोगाई येथे शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा सततपणे प्रयत्न करत आहेत.
ॲड. माधव जाधव यांनी इंग्रजी विषयाचे ग्रामर चे पुस्तक स्टेप बाय स्टेप अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजी ग्रामर समजण्यासाठी स्वतः प्रकाशित केलेले असून इंग्रजी व्याकरणाचे युट्युब वर लेक्चर सुद्धा ॲड माधव जाधव यांचे आहेत.वकीली व्यवसायासोबतच शिक्षण क्षेत्रामध्ये अविरतपणे गेल्या २५ वर्षापासून कार्यरत असलेल्या ॲड माधव जाधव यांना शिक्षण क्षेत्रातील डॉक्टरेट ईन एज्युकेशन ही पदवी नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी यांच्या वतीने बहाल करण्यात आली.शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी समर्पित आणि संस्थात्मक विकासात मोलाचा वाटा उचलणारे आदरणीय अध्यक्ष ॲड. माधव लिंबाजीराव जाधव यांनी शिक्षण क्षेत्राचा नवा चेहरामोहरा घडवण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

हा सन्मान त्यांच्या अविरत समर्पणाची आणि शिक्षण क्षेत्रातील प्रभावी कार्याची साक्ष देतो. संपूर्ण व्यवस्थापन, संपुर्ण मित्र परिवार, प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे!

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button