राजकारण

निवडणुका बॅलेट पेपर वर घ्या खा.रजनीताई पाटील

आगामी कॉग्रेस स्वबळावर निवडणुक लढणार

 

केज :- विधानसभा निवडणुका नुकत्याच संपल्या व या निवडणुकीचे निकाल अनपेक्षित आल्याने निवडणुका खरच लोकशाही पद्धतीने होत आहेत का ? असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्या खा. रजनीताई पाटील यांनी बोलताना विचारला. केज येथे आयोजित करण्यात आलेल्या इव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री अशोक पाटील हे होते.
ईव्हीएम हटाओ देश बचाओ, संविधान बचाओ हे अभियान भारतीय काँग्रेस पक्षाने सुरू केले असून या अभियानाची सुरुवात बीड जिल्हयात करण्यात आली याचा शुभारंभ केज येथे करण्यात आला बोलताना खा. रजनीताई पाटील यांनी सांगितले की देशात व विशेषतः महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात जनतेचा कौल होता, जनभावना विरोधात होती अनेक पोल देखील महायुतीच्या विरुद्ध होते तरीही यापूर्वी कधीही मिळाल्या नाही येवढ्या मोठ्या प्रमाणात जागा भाजप व मित्र पक्षाच्या येतात याचा अर्थ इव्हीएम् मद्ये काहीतरी गडबड आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाने हे अभियान सुरू केले आहे. येणारा काळ काँग्रेस पक्षचा आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी कामे करा यापुढच्या निवडणुका आता आपल्या कार्यकर्त्यांसह व त्यांच्यासाठीच लढायच्या आहेत प्रत्येक वेळी आपल्यावर जागा वाटपात अन्याय होतो मात्र आता आपण आपल्याच चिन्हावर या निवडणुका लढणार असल्याचे रजनीताई पाटील यांनी सांगितले.
————————-
अब मैं मैदान मे आऊंगा….. अशोक पाटील
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अशोक पाटील यांनी आपल्या खास शैलीतून पदाधिकारी व कार्यर्कत्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आणि आता जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे त्यामुळे मी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सैदव उपलब्ध असेल मला कधीही कुठेही बोलवा मी यायला तयार आहे. मोठ्या ताकतीने पक्ष संघटन करू आणि तेवढ्याच ताकतीने नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आपण काँग्रेसच्या चिन्हावर लढू अस मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
—————————
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी देखील या अभियानाची सुरुवात खा.रजनीताई पाटील यांच्या स्वाक्षरीने सुरुवात करून केली तर यापुढे प्रत्येक तालुका निहाय पक्ष बांधणी करून नव्या जुण्यांचा एकत्र येवून मोठ बांधून जिल्ह्यात पक्षाला पुन्हा शिखरावर नेण्याचे काम आपण सर्वजण करू अशी भावना व्यक्त केली.
यावेळी या कार्यक्रमाला आदित्य पाटील, नवनाथ थोटे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मीनाक्षी पांडुळे, अनुसूचित जाती सेल चे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे, सर्व तालुका अध्यक्ष, युवक चे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी, अनुसूचित जाती सेल चे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांचे सह प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button