शैक्षणिक

इस्रो अभ्यास सहलीसाठी ओजस कुलकर्णीची निवड

माजलगावचा सुपूत्र

 

माजलगाव:-नोबेल फांऊडेशन आणि भवरलाल जैन फांऊडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च (NSTS) ही परीक्षा घेतली जाते, यात प्रथम पात्रता परीक्षा नंतर लेखी परीक्षा आणि त्यात निवड होणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांची मुलाखत परीक्षा घेतली जाते, या तिन्ही अडथळ्यांच्या परीक्षा पूर्ण केल्यानंतर इयत्ता निहाय विद्यार्थ्यांची निवड केली जाते,
या परीक्षेत यश मिळवून निवडलेल्या विद्यार्थ्यांना या फाऊंडेशन मार्फत प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देण्यात येतेच परंतु या बाल वैज्ञानिकांना इस्रो या भारतीय अवकाश संशोधन केंद्र या ठिकाणी अभ्यास सहलीला जाण्याची संधी मिळते.शहरातील सिंधफणा पब्लिक स्कुल माजलगाव याठिकाणी इ.8वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी चि.ओजस अनिल कुलकर्णी याची या वर्षी निवड झालेली आहे,विशेष म्हणजे या परीक्षेत त्याच्या इयत्तेतून तो महाराष्ट्रातुन 3 रा क्रमांक आला आहे, शिवाजी नगर माजलगाव येथे राहणारे जि.प.शिक्षक अनिल सुभाषराव कुलकर्णी (नागडगावकर)यांचा तो मुलगा आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे शाळेद्वारे व समाजातील सर्व माध्यमाद्वारे कौतुक करण्यात येत आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button