सामाजिक
जेष्ठ विधिज्ञ साहेबराव नामदेवराव डोंगरे यांचे वृद्धपकाळाने निधन
माजी मंत्री आशोकराव (दादा) पाटील यांचे निकटवर्तीय

केज:- केज तालु्क्यातील कोठी गावातील केज येथे स्थायीक आसलेले जेष्ठ विधिज्ञ साहेबराव नामदेवराव डोंगरे हे गेल्या दोन तिन दिवसापासुन आजारी होते त्यांना अंबाजोगाई येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते पन त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नाही ते माजी मंत्री आशोकराव (दादा) पाटील अंत्यत जवळचे समजले जातात ते विखे पाटील कारखान्याचे संस्थापक संचालक आज पर्यत होते ते अंत्यत बुद्धिजिवी वकिल म्हणुन त्यांची ख्याती होती त्यांना एक मुलगा तीन मुली व पत्नी असा मोठा परीवार आहे
त्यांचा अंतविधी त्यांच्या मुळगावी कोठी येथे दिनांक ९ /१२/२०२४ येथे ८ वाजता होईल
त्यांना क्रांतीसुर्य न्युज कडुन भावपुर्ण श्रद्धांजली



