सामाजिक

महाजन साहेब केज मधे वाहतुकीसाठी नेमलेले पोलीस हप्ते मागण्यात दंग

केजच्या वाहतुकीचे ५ पोलीस आसताना बेशिस्त वाहने व हातगाड्यावर कार्यवाही कधी करणार

केज:- केज शहरात अपघाताची मालिकाच लागलेली दिसत आहे याकडे केज पोलीसाचे अक्षम्य दुरलक्ष झाल्याचे दिसत आहे आज केज मधे तांबवा येथील हरिभाऊ ठोंबरेचा या वाहतुकीचा फटका बसुन जीव गमवावा लागला हा अपघात इतका भयानक होता की मयत ठोंबरेचा मृत देह पोत्यात भरुन दवाखान्यात घेऊन जावा लागले मग गोरगरीब लोकानी केज ला जिव द्यायला यायचे का?
केज मधे पिसाटी पुल ते शिक्षक कॉलनी व भवानी मंदीर ते विठाई पुरम कॉलनी पर्यत रोड वर हवे तसे वाहन उभे केलेले आसतात ट्रॉफिक पोलीस फक्त मोटार सायकलीवरच कायम कार्यवाही करुन धन्यता मानतात मग बेशिस्त वाहने बागवानाचे हातगाडे रोड वर बसलेले छोटे व्यापारी रोडवरच्या पांढरी पट्टी च्या बाहेर आल्यावर त्यांच्या कार्यवाही व बेशिस्त वाहणावर दंड का टाकत नाही ट्रॉफिक पोलीस फक्त अवैध टम टम वर हप्ते वसुलीसाठीच हा विभाग तयार केला आहे का हा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडलेला आहे कोणीही मोठा आसला तरी त्यावर कार्यवाही अपेक्षीत आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button