राजकारण

बीड जिल्हा कॉग्रेसच्या अध्यक्ष पदी राहुल भैया सोनवने यांची नियुक्ती

केज:- बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हा अध्यक्ष पदी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीे चे उपाध्यक्ष नाना गवांडे दिले.
मागच्या दोन दिवसापूर्वीच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेकडे आपला राजीनामा दिला होता त्या अनुषंगाने दि.२७ रोजी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हा अध्यक्ष पदावर उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल सोनवणे हे विद्यार्थी दशेपासून काँग्रेस मद्ये काम करत आहेत एन एस यु आय चे प्रदेश सरचिटणीस या सह जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष पदावर देखील त्यांनी काम पाहिले आहे. उच्च शिक्षित, संयमी व सुस्कृत राजकारणी म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसच्या नेत्या खा.सौ. रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, आदित्य पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सोबत फोटो

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button