सामाजिक
कला (तमाशा) केंद्र चालु अन महिला समुपदेशन केंद्र बंद
पोलीस अधिक्षक साहेबांच्या आदेशाची पायमल्ली

केज:- केज तालुक्यासाठी शासनाने महिला विषयी तक्रार निवारण केंद्र स्थापन केले जेनेकरुन घरगुती तंटे समोपचाराने मिटावेत या साठी शासनाने परीपत्रक काढुन पोलीस ठाणेच्या आवारत महिला केंद्राची स्थापनेचे निर्देश दिले त्यानुसार केज पोलीस ठाणेच्या आवारात महिला केंद्र स्थापित झाले व त्यांचा कारभार व्यवस्थित चालु होता नंतरच्या काळात पोलीस ठाणे हे नविन जागेत बांधकाम करुन स्थलांतरीत झाले व जुन्या पोलीस ठाणेच्या जागेवर लोकनेते गोपिनाथराव मुंडे साहेबाच्या नाव आसलेले सभाग्रह बांधण्यासाठी महिला केंद्राला जागा खाली करण्यासाठी संबंधीत गुत्तेदाराने तगादा लावला तर महिला समुउपदेशन केंद्राने सरकारच्या परीपत्रकानुसार नविन पोलीस ठाणे आवारात जागा देण्यात यावी यासाठी पाठपुरावा केला पन त्यांना पोलीस ठाणे प्रमुखानी त्याला केराची टोपली दाखवली व आज कोणीतरी अज्ञातानी महिला केंद्राची बांधकाम केलेली खोली पाडुन महत्वाचे कागदपत्र पावसात भिजत आहेत तंटे मिटलेल्या फाईल्स आहेत चालु प्रकरणे आहेत आता गोरगरिब महिलांनी कोर्ट कचेरी करावी का असा सुर जनतेमधे आहे
आज केज पोलीस ठाणे हद्दीत कला केंद्र चालवु शकतात पन महिला समुपदेशन केंद्र पण पोलीस ठाणे जागा देण्या अभावी बंद पाडु शकतात
महिला केंद्र चालकाने पन कला केंद्रासारखा निधी पोलीस ठाणे कडे वर्ग करावा सगळ्या तुमच्या मागण्या मान्य होतील अन पोलीस ठाणेच्या आवारात तुम्हाला जागा मिळेल अन्यथा तुम्ही असेच भिजलेले कागदपत्र वाळत टाकुन कामकाज करायचे



