सामाजिक
राजकोट किल्ल्यावरील शिवस्मारक कोसळले; मोदींच्या प्रसिद्धीचा हव्यास भोवला
दूर्दैवी घटना महाराष्ट्रात जनतेतुन निषेध

दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून मालवण नजीक राजकोट किल्ल्यावर छत्रपती महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारने त्यावेळी मोठा इव्हेंट केला होता. आज तो पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पुतळा बसवण्यापूर्वी शिवप्रेमींनी आवाज उठवून पुतळा आकारहीन व शिल्पशास्त्रास धरून नसल्याचे कळवले होते. परंतु पंतप्रधान मोदींचा प्रसिद्धीचा हव्यास आडवा आला. इतिहासात नोंद होईल आणि प्रसिद्धी मिळेल अशा कोणत्याही प्रकल्पाचे उदघाटन मोदींच्याच हस्ते झाले पाहिजे असा जणू नियमच झाला आहे. मग गुणवत्ता फाट्यावर मारून वेळेआधी उदघाटन झाली तरी चालते.
चांद्रयान मोहिमेवेळी मोठ्या औत्सुक्याने संपूर्ण देश चांद्रयान मोहीम लाईव्ह पाहत होता. यान चंद्रावर लँड होताच अचानक यानाचे कव्हरेज बंद करून प्रसिद्धीसाठी भुकेले मोदी स्क्रीनवर झळकले आणि देशाचा मूड ऑफ केला. क्रिकेट वल्डकप वेळी तेच झाले आणि चांगल्या मॅचला पनवती लागली.
लोकसभा निवडणुका जवळ आल्याने अयोध्येतील राम मंदिर अपूर्ण असतानाही उदघाटन केले. आता मंदिर गळू लागले आहे. राजकोट किल्ल्यावरील शिवस्मारकही एक वर्ष होण्याआधीच कोसळले आहे. मोदी आणि भाजपा शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागतात. परंतु दुर्गसंवर्धन व अरबी समुद्रातील शिवस्मारक व इतर प्रकल्पांच्या दर्जाबाबत मूग गिळून गप्प बसतात.
केवळ मोदींना नौदल दिनाच्या मुहूर्तावर पुतळ्याचे उदघाटन करायचे म्हणून जनतेचे अडीच कोटी रुपये खर्चून जयदीप आपटे या अल्पअनुभवी कारागिराला काम दिले गेले. एका व्यक्तीच्या प्रसिद्धीसाठी देशातील कोट्यावधी शिवप्रेमींच्या भावना आज दुखावल्या आहेत. मराठ्यांना लुटारू म्हणणारे मोदी आणि भाजपाचे लोक याचे उत्तर देतील का?
आशा आहे कि, किमान या घटनेतून तरी अक्कल घेतील. जबाबदार कॉन्ट्रॅक्टर, अधिकारी व मंत्र्यांवर कारवाई होईल आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी उदघाटन करण्याची ईर्षा बाजूला ठेवून व शास्त्रोक्त व गुणवत्तापूर्ण शिवस्मारकाची उभारणी होईल.
जाहीर निषेध 🏴



