क्राईम

अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक, बीड व पोलीस निरीक्षक प्रशांत महाजनांनी आरोपीला पाठिशी घालुन बीड पोलीसाची मान झूकवली

हत्या व अपहरणाचा निषेध करणारे सर्वपक्षीय नेतेचा समावेश

सरपंचाच्या हत्येने व अमोल डुबे च्या अपहरणाने बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे

 

पालकमंत्री कोणालाही करा पन आ.धनंजय मुंडे ना करु नका राज्य सरपंच संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी

या घटनेने धडाकेबाज पंकज कुमावत साहेबाची आठवण आली

 गुन्हेगारात धडकी भरवणारा पोलीस निरीक्षक केज ला द्यावा जनतेची मागणी

केज-९/१२/२०२४ या दिवशी मस्साजोग च्या सरपंचाची पवन चक्कीच्या खंडणी प्रकरणात विरोध केल्यामुळे संतोष देशमुखाची हाल हाल करुन दिवसाढवळ्या हत्या केली अन केज खळबळ माजली केज च्या व्यापारी संघटनेने या घटनेचा निषेधार्थ मंगळवारी केज बंदची हाक दिली.
मयताचा मृतदेह रुग्नालयात दाखल झाल्यावर मस्साजोग चे रहीवासी आरोपीला अटक करण्यासाठी रस्तारोको करुन निषेध नोंदवला तो पहाटे ३ वाजेपर्यत चालु होता अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके उपअधिक्षक कमलेश मिना यांनी सकाळी ९ वाजेपर्यत सर्व आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले नागरीकानी आंदोलन स्थगित केले सकाळी दोन आरोपी ताब्यात घेण्यात यश आले पन मुख्यआरोपी पकडण्यात त्यांना यश आले नाही यामुळे मस्साजोगचे नागरिक मोठ्या संख्येने परत रस्ता रोको चालु केला
केज मधे सर्व समाज बांधव एकत्र येऊन पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषनाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको चालु केला पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील यांच्या भ्रष्ट कारभारा विरोधात केज शहरात संतापाची लाट उसळली होती पोलीस प्रशासनाने स्पेशल जनतेपुढे माघार घेत केज शहरात रात्री १० वाजे पर्यत कायदा सुव्यवस्था जनतेने हातात घेतली होती संतप्त युवकांनी आरोपीला आश्रय देणारे विष्णु चाटे त्यांचे बँनर व कार्यालय फोडले एक बस जाळली व धाराशिव येथुन बंदोबस्तासाठी पोलीसाना रस्त्यावर आलेल्या जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला व त्यांनी केज शहरातुन काढता पाय घ्यावा लागला.

संतापाची लाट पाहुन पोलीसानी संयमाने राहणे पसंत केले.

केज तालुक्यात रस्ता रोको चालु झाल्यावर अजुन एक बातमी समोर आली परळी मधे खंडणीसाठी अमोल विकास डुबे यांचे अपहरण झाले केज ताल्युक्यातील हत्या अन परळी झालेले अपहरण यांचे लोन सर्व जिल्ह्यात पसरले व सर्व पक्षीय नेत्यांनी आता जनतेच्या संयमाची परिक्षा न घेता आरोपीला अटक करण्यासाठी पत्रक काढुन घटनेचा निषेध केला.
खा.रजनिताई पाटील खा.बजरंग बप्पा सोनवने
आ.पंकजाताई मुंडे
आ.नमिताताई मुंदडा
आ.सुरेश आन्ना धस
आ.संदिप क्षिरसागर
माजी आ.पृथ्विराज साठे

श्री रमेशराव आडसकर

श्री राजेसाहेब देशमुख राहुल भैया सोनवने हारुणभाई इनामदार

केजच्या नगराध्यक्ष सिता बनसोड
कुंडलीक खांडे यांनी घटनेचा निषेध करत विशेष यंत्रने मार्फत चौकशीची मागणी केली त्यामुळे जनतेमधे समाधान दिसले.
मात्र या केज व परळीच्या घटनेने बीड जिल्ह्यात बॅकफुट वर आलेले आमदार धनंजय मुंडे त्यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णु चाटे व बीड जिल्हा पोलीस यांच्या संशयी भुमिकेने बीड जिल्ह्याची आब्रु महाराष्ट्रात घालवली ही भावना जनतेमधे दिसुन आली.
बीड च्या सर्व पक्षीय नेत्यांनी निपक्ष चौकशीची मागणी केली पन आमदार धनंजय मुंडेनी यांचा निषेध पन केला नाही किंवा बीड जिल्ह्यातील जनतेला शांततेचे आवाहन पन केले नाही मात्र त्यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे वाटते पालकमंत्री जरुर व्हावे पन युवकांना गुन्हेगार बनवण्यापेक्षा हाताला काम देण्याचे काम करावे ही कालच्या घटनेमधे दिसुन आली

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button