
केज!दैनंदीन जिवानात विश्वास ठेवल्याशिवाय मनुष्य यशस्वी होत नाही ते त्रिवार सत्य आहे पन त्याला घरी संस्काराची जोड लागते घरीच वडील लबाडीने मुलाला जगवत आसतील तर मुला कडुन संस्काराची किंवा इनामदाराची अपेक्षा समाजात नसते
अशी प्रवृती आज पदोपदी वाढत दिसत आहे
आपले पुर्वज विश्वासावर भरोसा ठेऊन १०० वर्ष जगले आज नियत बदलत आसल्याने वयोमर्यादा घटत आहे सकाळी उठल्यापासुन कोणाला चुना लावायचा यातच आपल्या डोक्याचा वापर करताना युवक दिसत आहे अन बाप कोणत्याही परिस्थितीत पोरगा जगत आहे यात समाधान मानत आहे अश्या युवकांचे लग्नाळुला आलेले तरुण बिनलग्नाचे राहत आहेत जे संपत्ती कमी जरी आसली तरी इनामदारीने कष्ट करुन राहत आहेत त्यांना मुलीचे वडिल शोधुन मुली देतात हे वास्तव आहे एखाद्या मुली साठी चांगला मुला साठी स्थळ आले की त्यांच्या गावात जाऊन मुलगा चांगला आहे का चौकशी करण्याचे दिवस संपले आता मुलगा चांगला आहे का बघण्यासाठी फक्त गणपती मिरवणुक शिवाजी महाराज मिरवणुक असे मिरवणुकीमधे मुलगा कसा दारु पिऊन शांताबाय या गाण्यावर कसा नाचतो हे बघितल्यावर मुलगी कसा देईल ही पद्धत मुलीचे वडिल वापरताना दिसत आहेत अन ही बिनलग्नाची टिम गुन्हेगारी कडे वळत आहे अन नेतेमंडळी यांचा वापर करुन सोडत आहे अश्या विविध कारणामुळे समाजात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे जर आपलेच वारसाला नितिमत्तेचे धडे शिकवण्यास कमी पडत आसाल तर दुसर्याकडुन चांगले वागण्याची अपेक्षा का ठेवता आज सर्व समाजात कुनी कुनावर भरोसा ठेवत नाहीत हे सर्व समाजासाठी घातक आहे १५ वर्षापुर्वी लोक म्हणायचे विश्वासराव पानिपत मधे गेले पन
आज घरोघरी विश्वासराव ने अखेरची घरघर घेताना दिसत आहे
त्यामुळे आपण कसे वागायचे त्यावर तुमचे जिवन सफल होताना दिसत आसते



