राजकारण

मंत्रीमंडळाच्या एका निर्णयाने अनेकांचे नगराध्यक्षाचे स्वप्न भंगले

पक्ष नेते घोडे बाजारापासुन वाचले

केज :- केज नगरपंचायत ची आडीच वर्षाची मुदत संपली अन सरकारने सर्व नगरपरीषद नगरपंचायत वर प्रशासकाची नेमणुक केली बीड जिल्याह्यातील काही नेते मंडळीनी नगरसेवक घेऊन सहलीवर एक महिनापुर्वीच गेलेले होते लाखो रुपये दररोज अध्यक्ष पद मिळेल या आशेपोटी खर्च करत होते हा त्यांचा खर्च पाण्यात गेला मग हा खर्च कोणत्या गंगाजळीतून करत आसतील यांचा विचार जनतेला पडलेला दिसत आहे

नाव नगरसेवक पण हे जनतेचे काम करण्यापेक्षा विकास कामात अडसर निर्माण करुन बेमाप पैसे खाण्यात धन्यता मानतात

आज केज मधे करोडो रुपयेचे कामे चालू आहेत यातील पन या नगरसेवकांना प्रसाद दिल्याशिवाय काम मार्गी लागले नाहीत हे केजच्या जनतेचे दुरदैव्य म्हणावे लागेल
निवडणुकीत काही पैसे घेऊन मतदान करणारे नालायक लोकामुळे ही परिस्थिती झालेली आहे एका नगरसेवकाला ५० लाख रुपये खर्च झालेला आहे झालेला खर्च वसुल करण्यासाठी २ वर्ष लागतात अन राहीलेली ३ वर्ष घर भरण्यात लागतात हे नगरसेवक जनतेच्या मतावर निवडुन येतात पन जानिवपुर्वक केजच्या विकासासाठी काडीचे योगदान नसते पक्ष प्रमुख पन या नगरसेवकाच्या तालावर नाचण्यात धन्यता मानतात अन मत दिलेल्या जनतेला विसरुन जातात त्यांचे पन खरय सत्ता टिकवायची आसल्यावर नगरसेवकांची गरज लागते जनतेची पाच वर्षात एखदा ते पाच दहा हजाराला मत खरेदी करुन जनतेला ही माहीत आसते हे पुढील पाच वर्षानीच हे मत मागायला हे येणार आहेत म्हणुन ते सर्व उमेदवाराकडुन पैसे घेऊन आपली पाच वर्षानीच दातखिळी उघडतात हे लोकशाहीला घातक आहे आज नगरसेवकांनी रस्ते केलेले आहेत ते स्मार्ट सिटी झाल्यागत आहे तीन इंच जाडीचे रस्ते म्हणजे केजच्या विकासाची पुढील पिढीसाठी एक पर्वणीच म्हणावे लागेल

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button