सामाजिक

मराठा आरक्षण व तिर्थक्षेत्र विकासासाठी मेलो तरी बेहत्तर रोहन गलांडे पाटील

लेखी आश्वासन हवेत विरले

केज:-
मराठा आरक्षणासाठी  मनोज जरांगे पाटील हे २० जुलै २०२४ पासून आंतरवाली-सराटी जि. जालना या ठिकाणी आमरण उपोषणास बसलेले आहेत.तरी  श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या विषयी महाराष्ट्र राज्य शासनाची भूमिका उदासिनतेची दिसून येत आहे.तरी मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या २० तारखे पासुन सुरू झालेल्या उपोषणाची दखल  घेऊन राज्य सरकारने केलेल्या मराठा समाजाच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात दि.२४/०७/२०२४ रोजी श्री संत नामदेव महाराज सभागृह येथे सकाळी १० वाजता रोहन गलांडे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहे मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असे निवेदनाद्वारे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज मंदिरासाठी तिर्थक्षषासाठी ५० लाख रुपये मंजूर झालेल्या निधीचे वितरण करून श्री संत नामदेव महाराज तिर्थक्षेत्राचे काम करु असे लेखी आश्वासना नंतर उपोषणाला स्थगिती देण्यात आली परंतू उपोषणाला स्थगिती देऊन एक महीना उलटुन सुध्दा काम सुरू केले नसल्याने परत २४/०७/२०२४ रोजी अमरण उपोषन सुरू करण्यात येणार आहे जो पर्यंत कामाला  प्रत्यक्षात  कामाला सुरुवात  केली जात नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहणार आहे असे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे .

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुंडे यांनी लेखी आश्वासन देऊन श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र विकास कामाला सुरुवात केली नाही तरी यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही मागणी मान्य  होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण चालु राहील असे निवेदनात नमुद आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button