Uncategorizedसामाजिक
लोकशाहीच्या मार्गाने उपोषन करणारे मरणाच्या दारात तरी मागणी मान्य होत नाही
सार्वजनिक बांधकाम विभागाचा तिसर्या दिवसीही महान प्रताप

केज:-केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज तिर्थक्षेत्र विकास कामाला सुरुवात करण्यात यावी म्हणून रोहन गलांडे पाटील यांचे अमरण उपोषन दोन दिवस पुर्वी झाले सुरू केले आहे व आज उपोषणाचा तिसरा दिवस असुन उपोषणकर्ते रोहन गलांडे पाटील यांची तब्येत बिघडली आहे त्यांना अशक्त पना आलेला असुन छातीत जळजळ होते आहे डोके जाम होत आहे व शुगर,बिपी लो झालेली आहे पन रोहन गलांडे यांनी म्हटले आहे की जोपर्यंत श्री संत नामदेव महाराज तिर्थक्षेत्र विकास कामाला सुरुवात होत नाही व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषणन सुरूच राहणार आहे यासाठी कोणतेही किमंत मोजायला मी तयार आहे असे रोहन गलांडे यांनी म्हटले आहे रोहन गलांंडे यांची प्रकृती चिंताजनक होत आहे .परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग केज उपोषणा कडे पाठ केल्याचे दिसुन येत आहे कारण दोन दिवसा पुर्वी ५० लाख निधीच्या विकास कामास सुरुवात केली आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणने आहे पन वास्तवीक पहाता हे पत्र एक महिन्या पुर्वीचे असुन तिर्थक्षेत्राचे काहीच काम केलेले नाही म्हणुन रोहन गलांडे पाटील यांनी काल २४/०७/२०२४ रोजी अमरण उपोषन सुरू केले पन परत आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू केल्याचा देखावा करुन रोहन गलांडे पाटील यांचे अमरण उपोषणावर प्रश्न चिन्ह निर्माण करुन तिर्थक्षेत्र विकास कामाचा निधी हडपण्याचा डाव सार्वजनिक बांधकाम विभाचा आहे का? असा प्रश्न रोहन गलांडे यांना पडला आहे कारण ५० लाख निधीच्या कामाला वीस तीस हजाराची अर्धवट सामग्री तिर्थर्क्षेत्रात टाकली आहे तरी पन गलांडे यांनी उपोषणाला सुरुवात केली असे दाखवायचे उपोषण सोडले कि जैसे थे परीस्थितीवर येऊन काम बंद करायचे व नंतर त्या कामाकडे दुर्लक्ष करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असुन जर असे होत राहनार असेल तर अमरण उपोषन सुरुच राहणार आहे जर उपोषणा दरम्यान जिवितास काही धोका निर्माण झाला तर प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग केज व अंबाजोगाई जबाबदार राहणार आहे असे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ तालुका अध्यक्ष रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मळीकर साहेब यांना अमरण उपोषना संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा अमरण उपोषणाला कडे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मळीकर तसेच इतर अधिकारी यांचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे हे नौकरशहाचे आर्थिक लागेबांधे दिसुन येत आहेत



