सामाजिक
खा रजनीताई पाटलाच्या दणक्यामुळे सुरेश कुटेच्या मालमत्तेवर ईडी चे छापे!
ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेवीदाराकडुन खा रजनीताई पाटलाचे कौतुक

बीड :- ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरणात पोलीस कोठडीत असणारे सुरेश कुटे यांच्या बीड, छत्रपती संभाजीनगर येथील घर, दुकान, तिरुमला आईल फॅक्ट्री व इतर मालमत्तावर सक्त वसुली संचलानालय अर्थात ईडी ने छापे घातले आहेत.कुटे यांना दोन अडीच महिन्यापूर्वी अटक झाल्यानंतर त्याची संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरु झाली होती. दरम्यान आतापर्यंत कुटे विरोधात तीनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पन्नास पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता ईडी ने कार्यवाहीचा बडगा उगारलेला आहे ईडी च्या अधिकाऱ्यांनी रात्री आठ वाजेपासून राधा क्लोथ सेंटर, हिरालाल चौक, एम आय डि सी येथील फॅक्ट्री, गोडावून, घर, संभाजीनगर येथील फॅक्ट्री सील केली आहे
ठेवीदाराला पैसे मिळण्याच्या आशा पल्लवीत
बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट मधील गोरगरीब जनतेचे पैसे अडकलेले आहेत मल्टीस्टेट च्या माध्यमातून हजारो कोटीचा घोटाळा झालेला आहे या ठेवीदारासाठी त्याचे पैसे मिळण्यासाठी खा.रजनीताई पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता,
खा.रजनीताई पाटील यांच्या मागणीला यश येऊन सुरेश कुटेच्या मालमत्तेवर ईडी ने मराठवाड्यात सर्वत्र छापे टाकून मालमत्ता सिल करण्यात आली आहे



