केज:- केज तालुक्यातील भांटुबा येथील गेली ३५ वर्षापासुन नंदकिशोर काकाजी मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली काम करत आसलेले माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे हे लोकसभेपासुन काकाजी पासुन दुरावले होते त्यांनी आज खा.बजरंग बप्पा सोनवने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे माजी सभापती किती मताधिक्क हे पृथ्विराज साठे देतात हे निवडणुकीच्या नंतरच कळेल चवरे हे मुंदडा गटासाठी अहोरात्र काम करणारे कार्यकर्ते होते पन लोकसभेला त्यांनी बजरंग बप्पासाठी काम केले आसल्याने ते मुंदडा गटापासुन दुरावले होते
केज शहरातील नगरसेवक पती सुग्रिव कराड यांनी आज बजरंग बप्पा सोनवने यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करुन साठे यांच्या प्रचारात उडी मारली आहे.
केज मतदार संघाचा विचार केला तर आमदार नमिताताईना फार मेहनत घ्यावी लागणार आहे २०१९ ला सोबत आसणारे रमेशराव आडसकर ,आंकुशराव इंंगळे, हारुनभाई इनामदार ,युवराज दादा काळे,अमर पाटील,असे बरेच नेते मंडळीनी २०२४ मधे आमदार नमिताताई मुंदडा यांची साथ सोडलेली दिसते यामुळे आमदार नमिताताई स्व:तावर आवलंबुन न राहता यांनी ओबीसी नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्यावर विश्वास ठेऊन निवडणुक लढवत आहेत परंंतु मराठा आरक्षण विरोधी लोकासोबत आमदाराने हातमिळवणी केलेली दिसत आहे त्यामुळे सतत होणार विजय यावेळी मात्र दृष्टीक्षेपात दिसत नाही
क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल
आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा
जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका
जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल