सामाजिक

जय हनुमान गणेश मंडळाच्या वतीने सारणी (आ) येथे रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदात्यास एक फळाचे झाड दिले भेट

 

केज;-  केज तालुक्यातील सारणी (आ) येथील जय हनुमान गणेश मंडळाच्या वतीने वेगळा व सामाजिक उपक्रम हाती घेत गावात रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले होते या शिबिराचा शुभारंभ सरपंच संतोष (बप्पा) सोनवणे व उप सरपंच रवि बापू सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला.
गणेश उत्सवात सद्या डिजे कडे तरुणांचा मोठा ओढा आहे मात्र यामध्ये असेही काही तरुण व गणेश मंडळ आहेत ते आपली सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असतात असाच उपक्रम केज तालुक्यातील सारणी (आ) येथील जय हनुमान गणेश मंडळाच्या वतीने सारणी येथे घेण्यात आला शनिवार दि.१४ रोजी सकाळी गावातील हनुमान मंदीरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये जवळपास २८ रक्तदात्यानी रक्तदान केले यावेळी गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान करण्याऱ्या व्यक्तींना एक फळाचे झाड भेट देण्यात आले व हे झाड जपल्यास मंडळाच्या वतीने त्या रक्तदात्याना एक हजार रुपयाचे बक्षीस देखील देण्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे झाड देऊन त्याचे संगोपन देखील करा असा सल्लाच यावेळी मंडळाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी सारणी (आ) चे उप सरपंच रवि सोनवणे यांच्यासह अनेक रक्तदात्याणी रक्तदान केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी विशाल सोनवणे, सुसेन सोनवणे, अक्षय सोनवणे, यांचे सह अनेक तरुण यावेळी उपस्थित होते.

 

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button