सामाजिक

अतिक्रमण ग्रस्त केजची जनता आता गतिरोधकमुळे त्रस्त

सार्वजनिक रस्त्यावरील गतिरोधक कमी करा. जनतेचा आक्रोश

 

केज:- केज शहरातील रोजा मोहलल्यातुन हा मुख्य रस्ता जातो त्या रस्त्यावर शासकीय कार्यालय पोस्ट ऑफिस शाळा दवाखाने बँक व दुकाने तसेच नगरपंचायत कार्यालय पोलीस उपविभागीय कार्यालय आहे त्या रस्त्यावर तब्बल 12 ते 14 गतिरोधक टाकून संबंधित गुत्तेदाराने अकलेचे तारे तोडले आहे. सदरील गतिरोधक ची उंची जास्त वाढल्यामुळे वाहन आदळुण
चीसी घासुन अपघात होत आहे त्या गतिरोधक वर मोटरसायकल आदळून दोन महिला तीन युवक जखमी झाले तर काही लोकांनी रस्ता बदलेला असुन
त्या रस्त्यावरून गरोदर महिलांची वाहने, रुग्णवाहिका, मणक्यांचे आजारी वयोवृद्ध आजारी रूग्णांना व सर्व सामान्य लोकांना गतिरोधक चा त्रास सहन करावा लागत आहे, गतिरोधकचा विरोध नाही पण संबंधित गुत्तेदार व प्रशासनाने त्याची संख्या व उंची कमी करून लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती द्यावी असे निवेदन नगरपंचायत केज च्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी गजमफर इनामदार, सय्यद सादत मंत्री,साबेर कुरेशी, शेख सादेक, कलीम इनामदार, इरफान कुरेशी जावेद कुरेशी,बुढन चाचु,समीर किल्लेदार,शेख बाबु,यांनी सह्या करून निवेदन दिले

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button