सामाजिक
केज नगरपंचायतच्या मुत्युच्या सापळ्यात जनता
लाखो रुपयेचा कर जमा आसताना पाईपलाईचा खड्डा बुजवायला पैसे नाहीत
केज:-केज नगरपंचायतचे कर्तव्यशुन्य मुख्याधिकारी व बेधूंद सत्ताधारी पक्ष नेस्तानाबुत विरोधी पक्ष यांच्यात जोरात समन्यवय दिसुन येतो यांच्यात कुठेही तक्रार किंवा कुरबूर दिसुन येत नाही. सर्व पक्षीय नगरसेवक आप आपल्या धूंदीत आहेत या सर्वाना नगदी स्वरुपात महिण्याचे बांधील पॅकेज मिळत आसल्यामुळे जनतेच्या प्रश्नावर यांच्या गळ्यातला आवाज पण क्षिण झालेला दिसून येतो आज केज मधे नगरपंचायत मधे बेधूंद पने कर्मचारी वागत आहेत त्यांच्यावर कोणाचाही आंकूश राहिलेला नाही केज मधे अनेक विकासाचे प्रश्न मागे पडताना दिसून येत आहे जिरायत खात्याचा प्रश्न नविन पाणी पुरवठा प्रश्न केज मधील वाहतुकीचा मोठा प्रश्न त्यासाठी बायपास करण्यासाठी कोणाचाही पुढाकार नाही केज मधे हजारो रुपये घेऊन बोगस गूठ्ठेवारी केली जाते यासाठी दलालाची नगरपंचायत मधे गर्दी दिसुन येते व्यापारी बांधव कर भरुन बेजार आहेत इतका कर भरुन पन जनतेला वेळेवर पाणी नाही स्वच्छता नाही वेळेवर लाखो रुपये भरुन पिटीआर, रहिवाशी,मुत्यु प्रमाणपत्र, जन्म दाखला, वेळेवर मिळत नाही जनतेच्या चकरा निर्डावुन गेलेल्या कर्मचार्याचे नखरे उद्या या परवा या दुपारुन या सकाळी या असे जनतेला खडसावुन सांगितले जाते
नगरसेवकांचे निवडुन आलेल्या वार्डावर लक्ष नाही त्यांचे एकच लक्ष नगदी पैसे भक्ष जनतेची कामे उद्ववस्त
गेल्या महिण्यात अंबाजोगाई रोडवर पाईप लाईन फुटली म्हणून मोठे पोकलेन आणून मोठा खड्डा खोदुन पाईप लाईन दुरुस्त केली पन खड्डा बुजवायला नगरपंचायत कडे निधीच उपलब्ध नाही मग मोठा अपघात झाल्यावर याला जवाबदार प्रशासन म्हणून केजचे मुख्यांधिकारी व संबधित कर्मचारी यांच्यावर सदोष मनूष्यवधाचा गुन्हा दाखला केला पाहिजे
केज नगरपंचायतला एक ही शाळा नाही तरी ही शिक्षण कर कोणासाठी घेते बहुतेक हा कर नगरसेवकांना बॅरिस्टर करण्यासाठी खर्च होत आसावा



