क्राईम

चोरी करणारा चोरटा गजाआड

६ लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त

केज:- बीड जिह्यात पिकअपची चोरी करुन धुमाकुळ घालणारा चोरटा दोन पिकअप सह लातूर जिल्ह्यातून केज पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असुन अटक करण्यात आली आहे.सदर गुन्ह्यातील एकूण ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर पहा

https://youtu.be/MrQu6EODNY4?si=_xpMbI7kRNf9BEX-

सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे तसेच आरोपीची कसून चौकशी चालू आहे अशी माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी बोलताना दिली आहे.या बाबत पोलीस ठाणे केज येथे गु.र.नं.३८७/२०२४कलम ३०३(३) बीएनएस व गु.र.नं.३९४/२०२४कलम ३७९ प्रमाणे पिकअप चोरीचे अज्ञात आरोपी विरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत.नमूद गुन्ह्यात चोरी गेलेल्या दोन पिकअपचा शोध घेत असताना माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील चोरी झालेले पिकअप हे लातूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.कमलेश मीना व केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून आरोपींच्या शोध कामी रवाना केले होते.सदर पथकातील अधिकारी पोलिस उप निरीक्षक श्री.राजेश पाटील व पोलिस कर्मचारी श्री. बाळासाहेब अहंकारे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीला लातूर जिल्ह्यातील रेणापुर येथून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मुसेफ अब्दुल रहीम कुरेशी,वय १९ वर्षे रा.सराई गल्ली बसवेश्वर चौक,रेणापुर ता.रेणापुर जि.लातूर यास ताब्यात घेऊन सदर आरोपी कडून सदरच्या गुन्ह्यात चोरीस गेलेले टाटा एसीई कंपनीचे ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे व महिंद्रा कंपनीचे २ लाख रुपये किंमतीचे पिकअप जप्त करण्यात आले आहे.असा एकुण ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीला मा.न्यायालया समोर हजर केले असता दिनांक २० जुलै २०२४ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे.सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक श्री. नंदकुमार ठाकूर बीड,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके आंबेजोगाई यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशान्वये पोलीस उप निरीक्षक श्री.राजेश पाटील,पोलीस नाईक दिलीप गिते,पोलीस हवालदार उमेश आघाव, पोलीस हवालदार बाळासाहेब अहंकारे, पोलीस अंमलदार रशीद शेख,पोलीस अंमलदार संतोष गिते यांच्या पथका ने केली आहे.सदर आरोपी कडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.त्याची कसून चौकशी चालू आहे आणखी एक आरोपीला अटक करण्याचे बाकी आहे अशी माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करत आहेत

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button