सामाजिक

पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला गेले तडे

मालवणच्या घटनेनंतर पन सरकारला जाग नाही बेधुंद शाहीने छत्रपती ची विटंबना

केज :- गेल्या काही दिवसांपूर्वी मालवणमधील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील एक घटना समोर आली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पिंपरी चिंचवडमध्ये उभारला जात असलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला उभारणी आधीच तडे गेल्याची घटना घडली आहे.

।यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा तब्बल 100 फुटी पुतळा उभारला जात आहे. मात्र हा पुतळा उभारण्यापूर्वी महाराजांच्या पुतळ्याला तडा गेल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे

महाराजांच्या या पुतळ्यासाठी महापालिका एकूण 47 कोटींचा खर्च करणार आहे. कारण दिल्लीमध्ये या पुतळा साकारून या पुतळ्याचे पार्ट पिंपरीत आणले जात आहेत. हा पुतळा प्रत्यक्षात 2025 मध्ये उभाराला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच महाराजांच्या पुतळ्याला तडा गेल्यानं हे काम निकृष्ट दर्जाचे आहे का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जातोय

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button