कृषी

दुष्काळाची पहिली घोषणा! राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित; शेतकऱ्यांसाठी १२ मोठ्या सवलतींची कवचकुंडले

मुंबई:-खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाची तूट आणि प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहिली कळ (Trigger-1) लागू केली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार या तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासनाने ही पावले उचलली आहेत.
प्रभावित क्षेत्रांमध्ये पीक परिस्थितीचे सर्वेक्षण, छायाचित्र आणि जीपीएस कोऑर्डिनेट्स संकलित करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच बाधित शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे आर्थिक मदत दिली जाणार आहे.
‘ट्रिगर-१’ (Trigger-1) म्हणजे काय?
शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार, दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया विविध टप्प्यांत (Triggers) विभागलेली असते:
पहिली कळ (Trigger-1): जून ते सप्टेंबर या कालावधीत पडलेल्या प्रत्यक्ष पावसाची आकडेवारी, पावसाची तूट आणि पावसातील खंड या प्राथमिक घटकांच्या आधारे दुष्काळाची पहिली स्थिती निश्चित केली जाते. जेव्हा एखाद्या भागात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस होतो, तेव्हा तेथे ‘ट्रिगर-१’ लागू होतो.
पुढील प्रक्रिया: ट्रिगर-१ लागू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बाधित भागातील पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, छायाचित्रे आणि जीपीएस (GPS) कोऑर्डिनेट संकलित करून वस्तुनिष्ठ पंचनामे केले जातात. या अहवालानंतर पुढील अंतिम मदत कार्यपद्धतीनुसार लागू होते.
दुष्काळग्रस्त भागासाठी जाहीर करण्यात आलेल्या १२ प्रमुख सवलती:
१. जमीन महसुलात सूट.
२. पीक कर्जाचे पुनर्गठन.
३. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती.
४. कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट (७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या आधीच माफ असलेल्या पंपांवरील क्षमतेच्या पंपांना ही सूट लागू राहील).
५. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.
६. रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे.
७. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर.
८. टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.
९. शेतीवर आश्रित शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी व्यवस्था उभी करणे.
१०. जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल अशी व्यवस्था करणे.
११. जलसंधारणाची कामे सुरू करणे.
१२. पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करणे.
दुष्काळ (Trigger-1) लागू झालेल्या तालुक्यांची जिल्हानिहाय यादी:
१. ठाणे विभाग
ठाणे व पालघर: निरंक (एकही तालुका नाही)
रायगड (१): श्रीवर्धन
रत्नागिरी (३): रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर
सिंधुदुर्ग (८): सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला
१. नाशिक विभाग
नाशिक (१०): मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा
धुळे (४): धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर
जळगाव (१५): एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल
नंदुरबार (६): अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी
अहिल्यानगर (१४): नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता
१. पुणे विभाग
पुणे (८): भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर
सोलापूर (११): उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा
सांगली (४): मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ
सातारा (६): सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर
कोल्हापूर (६): पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड
१. छत्रपती संभाजीनगर विभाग
छत्रपती संभाजीनगर (९): छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री
जालना (८): बदनापूर, घनसावंगी, अंबड, परतूर, मंठा, भोकरदन, जाफ्राबाद
बीड (११): बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी
लातूर (१०): लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट
धाराशिव (८): धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा, उमरगा
नांदेड (१४): नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव
परभणी (९): पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी
हिंगोली (५): हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत
१. अमरावती विभाग
बुलढाणा (१३): जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा
अमरावती (१४): अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, दर्यापूर
अकोला (७): अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मुर्तिजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी
वाशिम (६): वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा
यवतमाळ (१६): यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव
१. नागपूर विभाग
वर्धा (७): वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी
नागपूर (१४): नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर
भंडारा (३): भंडारा, पवनी, लाखंदूर
गोंदिया (१): तिरोडा
चंद्रपूर (१२): चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा
गडचिरोली (२): गडचिरोली, चामोर्शी

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button