शिक्षक दिनानिमित्त केजमध्ये गुणवंत शिक्षकांचा होणार गौरव; श्री. रमाकांत बापू मुंडे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात सन्मान

केज येथे श्री. रमाकांत बापू मुंडे यांचा अभीष्टचिंतन व शिक्षक दिन सन्मान सोहळा; भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन
केज :-श्री. रमाकांत बापू मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळा आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुणवंत शिक्षकांचा गौरव समारंभ शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत हा सोहळा पार पडणार असून, याचे आयोजन सिद्धिविनायक शैक्षणिक सेवाभावी संस्थेचे सहसचिव श्री. मधुर रमाकांत मुंडे यांनी केले आहे.
संत-महंतांची उपस्थिती
या सोहळ्यास ह.भ.प. श्री महंत भगवान महाराज वरपगावकर, ह.भ.प. श्री केशव महाराज सारूक शास्त्री (नागेशपुरी मठ संस्थान, नांदगाव) आणि ह.भ.प. श्री केशव महाराज घुले शास्त्री (टाकळीकर) यांचे पावन सानिध्य लाभणार आहे.
विशेष सत्कार व शिक्षक सन्मान
याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्री. विठ्ठलराव शंकरराव जानकर, श्री. विलास शेषेराव नागरगोजे आणि श्री. बळीराम विठ्ठल वायकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच शिक्षक दिनानिमित्त प्रा. श्री. हनुमंत शिवाजीराव भोसले, प्रा. श्री. डॉ. हनुमंत भिमदेव सौदागर, श्री. मुस्ताक समद करोरे सर, श्री. भागवत दादाराव सोळसने, श्री. अनंत कान्होबा गायकवाड आणि श्री. सतीश बापुराव देशमुख या आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात येईल. यासोबतच सेवानिवृत्त केंद्र प्रमुख श्री. देविदास भानुदास नागरगोजे (वनसारोळा) आणि श्री. शंकर भगवानराव मुंडे (विडा) यांचाही सेवा निवृत्तीपर गौरव होणार आहे.
रक्तदान शिबिर व स्नेहभोजन
सामाजिक बांधिलकी म्हणून सकाळी १०:०० वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी १:०० ते ४:०० या वेळेत उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सिद्धिविनायक शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूल, श्री. रमाकांतजी बापू मुंडे खाजगी आयटीआय व ईश इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा व स्थळ:
वार व दिनांक: शनिवार, दि. ०५ सप्टेंबर २०२६
वेळ: रक्तदान शिबिर – सकाळी १०:०० वा. | मुख्य सोहळा – सकाळी ११:०० ते दु. १:०० वा. | स्नेहभोजन – दु. १:०० ते ४:०० वा.
कार्यक्रमाचे ठिकाण: सिद्धिविनायक शैक्षणिक संकुल, श्रीकृष्ण मठा समोर, बीड रोड, केज, जि. बीड



