Uncategorizedसंपादकीय
“खिशात दोन लाख, कामाची राख; सीएनजीच्या रांगेत साहेबांचा थाट, गरीब जनतेची मात्र वाट!”
'नाव मोठे लक्षण खोटे'; पगार लाखात आणि कामाच्या वेळी सरकारला खंड्यात लोटे
केज:- एकीकडे सामान्य माणूस आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे, तर दुसरीकडे लाखो रुपये पगार घेणारे काही ‘पांढरपेशी’ सरकारी अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्याच्या वेळेत पेट्रोल पंपांवर सीएनजी भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. “पगार सरकारी आणि काम खासगी” असाच काहीसा प्रकार सध्या शहरात पाहायला मिळत आहे.
पगार लाखात, काम शून्यात?
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक उच्चपदस्थ सरकारी नोकरदार सकाळी कार्यालयात हजर राहण्याऐवजी आपल्या खासगी गाड्या घेऊन सीएनजी पंपांच्या लांबच लांब रांगेत दिसतात. २ ते ३ लाख रुपये महिना पगार घेणारे हे ‘भिकारचोट’ वृत्तीचे कर्मचारी कामाच्या वेळेत लाईनमध्ये उभे राहून आपला वेळ (आणि पर्यायाने सरकारचा पैसा) वाया घालवत आहेत. कार्यालयात टेबल रिकामे पाहून सामान्य जनता ताटकळत उभी असते, तर साहेब मात्र पंपावर इंधन भरण्यात मग्न असतात.
जनतेचा पैसा इंधनासारखा जळतोय!
जनतेने भरलेल्या करातून या अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार दिला जातो. मात्र, शिस्तीचा अभाव आणि कर्तव्याप्रती अनास्था यामुळे हे अधिकारी वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत. “जर तुम्हाला सीएनजी भरायचा आहे, तर तो कार्यालयीन वेळेच्या आधी किंवा नंतर का भरला जात नाही?” असा संतप्त सवाल आता करदाते नागरिक विचारत आहेत.
काही महत्त्वाचे प्रश्न:
• कर्तव्याच्या वेळेत पंपावर उभे राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का?
• सरकारी कामाचा खोळंबा करून स्वतःची सोय पाहणाऱ्यांना ‘भिकारचोट’ का म्हणू नये?
• बायोमॅट्रिक हजेरी असूनही हे कर्मचारी कामाच्या वेळेत बाहेर फिरतात कसे?
‘नाव मोठे आणि लक्षण खोटे’ अशी अवस्था झालेल्या या सरकारी यंत्रणेला आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. पगार घेताना लाखांच्या गप्पा मारणारे हे कर्मचारी सामान्य माणसाच्या वेळेची किंमत कधी समजून घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल
धिक्कार असो अशा कामचुकार नोकरदारांचा!
पगार घेतात लाखात, पण कामाच्या वेळी दिसतात सीएनजीच्या रांगेत! सामान्य जनता कार्यालयात ताटकळतेय आणि साहेब पेट्रोल पंपावर वेळ मारून नेतात. अशा ‘भिकारचोट’ वृत्तीच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे!
“पगार लाखात, पण वृत्ती भिकारात! सरकारी वेळेची चोरी करून सीएनजी भरणारे ‘कामचुकार’ जनतेचे गुन्हेगार आहेत!”



