Uncategorizedसंपादकीय

बीड जिल्ह्यात भाजप विरोधी प्रचंड लाट

एकाकी खिंड लढवत बजरंग बप्पा सोनवणे आघाडीवर

बीड:- लोकसभेची निवडणूकीची तारीख जवळ येईल तसे जवळपास चित्र स्पष्ट होताना दिसत आहे  पंकजाताई मूंडे या भाजप कडून उभ्या आहेत तर दूसरी कडे धनंजय मूंडे चे पहील्यापासूनचे  शिपेसालार बजरंग बप्पा सोनवने हे एैनवेळी पक्षातर करून शरद पवार  राष्ट्र्वादी  कॉग्रेस कडून उभे आहेत पन यावेळी मराठा आरक्षण मूद्दा जोरात आहे पन भाजपच्या नेत्या पंकजाताई अन त्यांची बहीण प्रितमताई दहा वर्षापासून खासदार आहेत तर त्यांचे वडिल गोपिनाथराव मूंडे साहेब उपमूख्यमंत्री ते केंद्रिय  ग्रामविकास मंत्री अन पंकजाताई आमदार ग्रामविकास मंत्री पालकमंत्री महाराष्ट्र राज्य अन त्यांचे चूलत भाऊ धनंजय मूंडे साहेब इतके पदे भोगून पन यांच्या वर जर अन्याय होत आसेल तर असा अन्याय प्रत्येक बीडच्या नागरीकावर  व्हायला हवा राहीली गोष्ट मराठा नेत्याची यांना मराठा नेता म्हणून पन यांना कूठेही मराठा समाजाने किमंत देण्याची तसदी घेतली नाही यांनी फक्त सत्ताधारी भाजपकडून पद घेण्यात धन्यता मानली

जात बघून मराठा समाज मतदान करत आलेला नाही पन या आरक्षण  विरोधी  भाजपने जात बघून मतदान करण्याची वेळ मराठा समाजावर आणलेली आहे त्यांची झळ आता भाजपच्या सर्व नेत्यांना बसत आहे 

बीड लोकसभेची निवडणूक ही सत्ताधारी पक्षाकडून डझनभर नेते खासदार  आमदार  पालकमंत्री केंद्रीय मंत्री मूख्यमंत्री पंतप्रधान यांच्या सभेच्या फैरी दररोज झडत आहेत आज मराठा बहूल भागात उदयनराजे भोसले हे यू वडगाव येथे जाहीर सभा होत आहे तर दूसरी कडे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारासाठी शरद पवार जयंत पाटील रजनीताई पाटील आनिल देशमूख यांनी प्रचार सभा घेतल्या 

ताई तूम्ही जिल्ह्यातील  मराठा नेते  आमदार बाळासाहेब आजबे आमदार सूरेश धस आमदार बाळासाहेब पवार  अमरसिंह पंडीत  आमदार  प्रकाश सोळूंके रमेशराव आडसकर  राजेद्र मस्के   गोरखदादा रसाळ सूनिल आबा गलांडे  असे  बरेच मराठा नेते तूमच्या दिमतीला आहेत तरी तूमच्या पायाखालची वाळू सरकताना दिसत आहे  तूमच्या  प्रचारासाठी  खद्द पंतप्रधान  मोदी साहेब गडकरी साहेब आज उदयन राजे अजून  मतदानाची तारीख पूढे ढकलून पाकिस्तानातून कोणी आनायचे आसेल तर त्यांचीही चाचपनी केलेली बरी होईल 

तूम्ही  प्रचारासाठी  कोणीही आणले तरी आरक्षण  विरोधी भाजपला  मतदान रूपी धडा शिकवल्याशिवाय मराठा समाज थांबणार  नाही 

रामकृष्ण हरी

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button