सामाजिक

जितेंद्र आव्हाड विरोधातील भाजपचे आंदोलन म्हणजे चिनाल बाईने पतिव्रतेवर भाषण देणे होय

जितेंद्र आव्हाडानी जाहीर माफी मागितली

केज :-
– दादासाहेब शेळके,भिम टायगर सेना
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
एखाद्याने मर्डर केल्या बरोबर न्यायालय आरोपींना तात्काळ शिक्षा देत नाही.तर शिक्षा देण्या अगोदर आरोपीने खून करण्यापाठी मागची भावना अर्थात हेतू लक्षात घेऊनच न्यायालय शिक्षा देत असते किंवा निर्दोष सोडत असते.हे सांगण्याचा उद्देश एवढाच मुतण्या लायक असलेली मनुस्मृती अभ्यास क्रमात नको म्हणून राज्य शासनाच्या विरोधात सभागृहात जयभीम म्हणणारे माझा बाप एकच डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे ठासून सांगणारे जितेंद्र आव्हाड यांच्या हातून मनुस्मृती दहन कार्यक्रमात मनुस्मृतिचे फोटो फाडत असताना अनावधाने विश्वरत्न प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्या गेला होता.त्या संदर्भात जितेंद्र आव्हाड पळून न जाता स्वतःजनते समोर येऊन नतमस्तक होऊन टीव्ही चॅनलच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली होती.तरी पण भाजप व भाजपला आतून बाहेरून लपून पाठिंबा देणारे सुद्धा वरील घटनेचा निषेध करत आहे.हे दुर्दैव आहे.आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर बद्दल पुळका दाखविणाऱ्या भाजपला मला विचारायचे आहे.जेव्हा
1) 9 ऑगस्ट 2018 ला जंतर-मंतर,दिल्ली येथे काही मनुवादी संघटणेणे भारतीय संविधान जाळले तेव्हा भाजपने निषेध/आंदोलन का केले नाही ? तेव्हा भाजप शेपूट घालून बसली होती की काय ? याचे उत्तर भाजपने द्यावे जितेंद्र आव्हाडाचा विरोध करणारे आंदोलन करणाऱ्या भाजपने
2 ) 26 ऑगस्ट 2017 ला अनंतकुमार हेगडे भाजपचे केंद्रीय मंत्री असताना त्यांनी कर्नाटकातील जिल्हा असलेल्या कोपल शहरातील ब्राह्मण युवा संम्मेलनात भाषण करताना म्हणाले होते.भारतीय जनता पार्टीचा खरा अजेंडा या देशाचे भारतीय संविधान बदलणे आहे.तेव्हा केंद्रीय मंत्री हेगडे यांच्या विरोधात भाजपने व भाजपला आतून बाहेरून लपून पाठिंबा देणार्यानी हेगडे च्या विरोधात का आंदोलन केले नाही ? तेव्हा ते एकमेकाची कपाळावर मारून घेत होते की काय ? याचे उत्तर भाजपने द्यावे.
3) भाजपला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा पुळका होता तर मग त्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) शालेय शिक्षणात भगवत गीता व मनुस्मृती लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या निर्णयाच्या विरोधात भाजपने विरोध,निषेध व आंदोलन तर सोडा साधा तोंडातून निषेदाचा ब्र शब्द सुद्धा काढला नाही.भाजपच्या नेतेमंडळी शेपूट खाली घालून बसले होते का ?
उलट जितेंद्र आव्हाड सारखा बहुजन नेता शालेय शिक्षणात मनुस्मृतिचे श्लोक लागू करणार्या राज्य शासनाच्या विरोधात महाड येथे जाहीर रित्या मनुस्मृतिचे दहन करीत असताना जितेंद्र आव्हाड यांच्या हातून अनावधाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्या जाते हे आव्हाड यांच्या लक्षात येताच जाहीर माफी मागतो असे असताना भाजप जितेंद्र आव्हाड चा निषेध करुन आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत दुःख याचे आहे की भाजपच्या या कृत्याला आतून बाहेरून लपून पाठिंबा देणारे पक्ष सुद्धा बळी पडत आहेत.मुळातच मनुस्मृतिला नंगे करणार्या आव्हाड यांच्या हातून चूक झाली व त्यांनी चुक कबूल केली व माफीही मागितल्या नंतरही भाजप आव्हाड यांना बदनाम करत असेल तर यालाच ब्राह्मण निती म्हणतात.ह्या ब्राह्मण नितीला दुर्दैवाने अनेक पक्ष दक्षिण्या (चंदा) साठी बळी पडत आहेत.नव्हे तर भाजप कडुन सुपारी घेत आहेत. खरा आंबेडकरवादी कधीही चिनाल ला चिनाल व पतिव्रतेला पतिव्रताच म्हणत असतो मग तो व्यक्ती घरचा असो की दारचा जर खरेच भाजपला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुळका असेल व भाजपला मनुस्मृति नको असेल तर त्यांनी उद्यापासून महाराष्ट्रभर मनुस्मृतीचे दहन करून त्याची डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति असलेली नैतिकता सिद्ध करावी.अन्यथा भाजपचे जितेंद्र आव्हाड च्या विरोधातील आंदोलन म्हणजे चिनाल बाईने पतिवृते वर भाषण देणे होय.बाकी काही नाही.
टिप :
हा लेख लिहिणे याचे कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकविले खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणे मग ते आपला असो की विरोधक हा लेख लिखित असताना आमचे कोणत्याही पक्षाशी संबंध नाही की कोणत्याही पक्षातील नेत्याची तीळ मात्र संबंध नाही कोणाच्या समर्थनार्थ हा लेख नाही.फक्त सत्यता उघड व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे.
जयभीम जय,जय संविधान, जय भारत
दादासाहेब शेळके,मो.8766744644
राष्ट्रीय अध्यक्ष, भीम टायगर सेना

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button