सामाजिक

केजच्या माहेश्वरी समाजाचा स्तुत्य उपक्रम महिला कॅन्सर लसीकरण मोहीम राबविली

पहेलगाम शहींदाना वाहिली श्रद्धांजली

केज:-  बांगड माहेश्वरी मेडिकल वेल्फेअर सोसायटीच्या सहकार्याने महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा ,बीड जिला, महेश सेवा संघ यांच्या वतीने केज तालुका माहेश्वरी समाज यांच्याकडून ९ ते १४ वयातील बालक व १५ ते२६ वयोगटातील तरुणीचे कॅन्सर लसीकरण दिनांक ११ मे रोजी केज येथील अजय क्लिनीक मध्ये पूर्ण झाले.
या कार्यक्रमाची सुरुवात महेश भगवान यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन बीड जिल्हा सेवा संघटक मंत्री श्री गिरीशजी सोनी यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाहेती तसेच बीड जिल्हा उपाध्यक्ष ओमशेठ भुतडा केज तालुका माहेश्वरी सभा अध्यक्ष मनीष जाजू, सचिव सचिन भुतडा, माहेश्वरी समाजाचे जेष्ठ मुरलीधर भराडिया, रामेश्वर जाजू, सतीश काकाणी, संतोष बियाणी, कैलास जाजू तसेच महिला मंडळ मंगल भन्साळी, दिपिका जाकिटिया, अनिता भुतडा, कांताबाई जाजू, इंदानी, दुर्गाजाजू , डॉ.निशा चांडक, यांची उपस्थिती होती यावेळी डॉ. सूरज चांडक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गिरीष सोनी म्हणाले की, भारतात कॅन्सरचा प्रभाव दिवसा न दिवस वाढत असून कोणताही आजारावर उपचार ऐवजी प्रतिबंध महत्त्वाचा असतो. कॅन्सर ची लस भारतात उपलब्ध झाली असून बांगड वेल्फेअर सोसायटी यांनी माफक दरात लस उपलब्ध करून दिल्यामुळे २१ जणांना लसीकरण करण्यात आले भविष्यात लसीकरण प्रोजेक्ट चालू राहतील असे तालुका अध्यक्ष मनीष जाजू यांनी सांगितले ‌ महेश सेवा संघ बीडचे प्रोजेक्ट चेअरमन किशोर बाहेती यांनी जनजागृती करून मोलाची भूमिका बजावली. कार्यक्रमाची सांगता शहीद जवान व पहेलगाम शहिदांना  श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीताने करण्यात आली आली.
या कार्यक्रमासाठी सचिन भूतड़ा संतोष बियाणी, कैलास जाजू, चंद्रकांत भूनकर यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन मनीष जाजू यांनी केले.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button