क्राईम

बीडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवा! अंजली दामानिया

केज:-बीड जिल्ह्यात सध्या गुंडगिरी, राजकीय वरदहस्त असलेले स्वयंघोषित दादा-भाई, आणि दिवसान दिवस वाढणारी दहशत यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी बीडमध्येही लष्कराच्या धर्तीवर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्याची जोरदार मागणी केली असून, त्यांच्या या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

सिमेपलीकडील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देणारे भारतीय लष्कराचे ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानसाठी धडकी भरवणारे ठरले होते. आता त्याच धर्तीवर बीडमध्येही अशी कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून गुंडांचे कंबरडे मोडले जाईल, अशी भावना दामानिया यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही वर्षांत बीडमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. गावागावात भाईगिरी करणारे, राजकीय वरदहस्ताने चालणारे गट निर्माण झाले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये अल्पवयीन तरुणाला अमानुष मारहाण करतानाचे दृश्य व्हायरल झाले, ज्यावरून बीडमधील भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आले.

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या हे त्याचेच उदाहरण. ९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच असलेल्या देशमुख यांची निर्घुन केलेली हत्या केवळ दहशतीचा भाग म्हणून करण्यात आली होती. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, लोकांच्या दबावामुळे तपास पुन्हा सुरू झाला आणि काही आरोपी तुरुंगात गेले. पण अजूनही मसल्स आणि मनी पॉवर पुढे सामान्य जनता हतबलच आहे.

अंजली दामानिया : “ही वेळ ठोस पावले उचलण्याची” :

दामानिया म्हणाल्या, “सीमेवर जसं ऑपरेशन सिंदूर केलं गेलं, तसं महाराष्ट्रात बीडमध्येही करावं लागेल. परळी सारखा भाग आता दहशतीचा अड्डा बनला आहे. १८ वर्षाच्या मुलांच्या गटाने ज्या प्रकारे मारहाण केली, ते दृश्य पाहून संताप येतो. यापुढे याला सहन केलं जाणार नाही.”

त्यांच्या या मागणीला समाजमाध्यमांवर मोठा
प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी त्यांच्या मताला समर्थन दिलं आहे. काहींनी ही मागणी अतिशयोक्तीपूर्ण असल्याचं म्हटलं असलं, तरी बीडमधील वास्तव पाहता आता कठोर उपायांची नितांत गरज असल्याचे स्पष्ट होते.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button