क्राईम

वाल्मिक कराड गँगच्या क्रूरतेचे ६६ पुरावे, १८४ जबाब; ‘तो’ मारहानीचा व्हिडीओही सीआयडीच्या हाती

सत्तेची मस्ती संपत्तीचा माज आत्ता जेलमधेच जिरणार

केज:- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी, अटकेत असलेल्या वाल्मीक कराड आणि त्याच्या टोळीने अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. या टोळीने पाइपला करदोड्याने मूठ तयार करून तसेच लोखंडी पाईपमध्ये क्लच वायर टाकून देशमुख यांना बेदम मारहाण केली. तपासादरम्यान, सीआयडीने कराड आणि त्याच्या टोळीविरोधात तब्बल ६६ भक्कम पुरावे गोळा केले आहेत, तसेच १८४ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यात पाच गोपनीय साक्षीदारांचाही समावेश आहे.

मारहाण करताना ‘एन्जॉय’ केला

देशमुख यांना कपडे काढून, निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली. हे करताना आरोपी मोठमोठ्याने हसत होते आणि घटनेचा आनंद साजरा करीत होते, असा दावा सीआयडीने आरोपपत्रात केला आहे. आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओदेखील बनवला, जो सीआयडीच्या हाती लागला आहे.

ऑडिओ, व्हिडिओ क्लिपही जप्त

कराड आणि विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून खंडणी मागितली होती. त्याचे कॉल रेकॉर्डिंग सीआयडीने जप्त केले आहे. काही व्हिडिओदेखील सीआयडीच्या हाती लागले आहेत. चाटेच्या कार्यालयातील बैठक, नांदूर फाटा येथे तिरंगा धाब्यावर हत्येचा कट आणि इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केल्याचे सीआयडीने न्यायालयाला सांगितले.

काय आढळले पुरावे?

एक गॅसचा पाइप ज्याची लांबी ४१ इंच आहे. एका बाजूला गोलाकार केलेली मूठ असून, त्यावर काळ्या करदोड्याने मूठ तयार केली आहे. याच पाइपवर लालसर रक्ताचा डाग आढळला.
एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार मूठ असलेला पाइप, ज्यात लोखंडी तारेचे ५ क्लच वायर बसवलेले आहेत. त्याची लांबी ४१.५ इंच आहे.
अपहरण केलेल्या वाहनातील चालक सीट, मॅटिंग व इतर ठिकाणी रक्ताचे डाग.
सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक वाहनात आढळले.
प्लॅस्टिकचे काळ्या काचांचे, काळ्या रंगाचे दोन गॉगल्स.
काळ्या व पांढऱ्या रंगाचा गोल गळा असलेले टी शर्ट.
एक काळ्या रंगाची १० नंबर साइज असलेली स्लिपर चप्पल.
एक काळ्या रंगाचे लेदर जॅकेट.
एक काळ्या रंगाचे घड्याळ, काळ्या रंगाचा बेल्ट.
आवाजाचा नमुना (अहवाल अप्राप्त).

१२ मार्चला सुनावणी

हत्या प्रकरणात एकूण ९ आरोपी होते. यातील सिद्धार्थ सोनवणे याला पुराव्यांअभावी वगळले आहे. आता १२ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button