क्राईम

संतोष देशमुखांच्या हत्येचं 3333 कनेक्शन, खळबळजनक माहिती समोर

बीड जिल्ह्यात संघटीत गुन्हेगारीची वाढ

सुदर्शन घूले | बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याची घटना ९ डिसेंबर २०२४ ला घडली होती. या घटनेनं राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मात्र देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले असले तरी देखील हे प्रकरण अजूनही चांगलंच तापलेलं दिसत आहे. या घटनेत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे, मात्र एक जण अद्यापही फरार आहे. अशातच आता या हत्या प्रकरणी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.

आरोपींना फाशीची शिक्षा द्या :

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राज्यातील विविध भागात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. मात्र या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसमवेत सामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार व विष्णू चाटे यांना अटक केली. मात्र हत्येनंतर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार होते
दरम्यान, या घटनेला 22 दिवस उलटले तरी देखील आरोपी पोलीस आणि सीआयडीच्या हाती लागत नव्हते. मात्र अखेर मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली. तर त्याच दिवशी त्यांना मदत करणाऱ्या आणखी एकाला मुंबईतून अटक करण्यात आलं आहे. मात्र अद्यापही या घटनेतील आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे.

सुदर्शन घुले अन ३३३३ कनेक्शन :
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप होत आहेत. मात्र पुण्यातून या आरोपींना अटक करण्यापूर्वीच ३१ डिसेंबरला वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना केज न्यायालयाने १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली आहे.

मात्र आता मिळलेल्या माहितीप्रमाणे सुदर्शन घुलेची आधीपासूनच त्याच्या गावासह तालुक्यात दहशत असल्याची माहिती समोर आली आहे. कारण सुदर्शन घुले हा ३३३३ हा नंबर लकी मानायचा, सुधीर सांगळे याच्यासह त्याची जी गँग होती तीचं नाव देखील ३३३३ च असल्याची माहिती मिळाली आहे. एवढंच नाही तर घुलेने सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी जी गाडी वापरली होती, त्या गाडीचा नंबर देखील ३३३३ च होता. त्यामुळे हा हत्येमागे ३३३३ कनेक्शन असल्याचं समजत आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button