ए पी आय गणेश मुंडे ला निलंबीत करा शरद पवार गटाकडून मोठी मागणी
खासदार बजरंग बप्पा सोनवने यांना दिली होती धमकी
अध्यक्ष/राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
०६.०१.२०२५
प्रति,
तहसीलदार महोदय, तहसील कार्यालय, केज ता. केज श्री. बीड.
विषय : बीड जिल्हा पोलिस दलातील ए.पी.आय. गणेश मुंडे यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे.
महोदय
वरिल विषयी नम्र विनंती करण्यात येते की, मागील तीन वर्षात गणेश मुंडे एपिआय हे हप्तावसुली पथकाचे प्रमुख असतांना प्रचंड मोठ्या प्रमाणात माया जमा केली. त्यानंतर त्यांना अवैध वाळू उपसा व वाहतुकीतुन मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट मार्गाने पैसे मिळत आहेत. त्यामुळे गणेश मुंडे ए.पी.आय राष्ट्रीय महामार्ग पथक यांना आपल्या पदाच्या जवाबदारीचे भान राहिलेले नाही. त्यांचेकडुन सामाजिक सुरक्षा बिघडण्याची शक्यता आहे.
काल दि. 04/01/2025 रोजी आपले मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या व्हॉस्टअपच्या बीड पोलिस प्रेस ग्रुपवर त्यांनी बीडच्या सन्माननिय खासदारांच्या विरोधात घाणेरडी प्रतिक्रिया दिलेली आहे. हा प्रकार अत्यंत निंदनिय असल्यामुळे श्री. गणेश मुंडे एपिआय राष्ट्रीय महामार्ग यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे.
आपले विश्वासु,
शरदचंद्र पवार गट



