सामाजिक

बीड जिल्ह्यातील डि.पी.सी.संघटीत तुकडा गॅग गोत्यात शेकडो लाभार्थी जेलच्या वाटेवर

माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या २ वर्षाच्या कामकाजाची होणार चौकशी पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा

 

बीड:- २०२३ ते २०२४ ते २०२५ च्या जिल्हा नियोजन समितीच्या प्रशासकीय मान्यतेची होणार चौकशी

तीन सदस्यीय चौकशी पथक समिती गठीत; एका आठवड्यात देणार अहवाल

बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाला… या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता… याबाबत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.. नियोजन समितीची बैठक होताच आता २०२३ ते २०२४ व २०२४ ते २०२५ सालच्या बीड जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सर्वकष चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक गठीत करण्यात आले आहे. यामध्ये धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष असतील तर अर्थ आणि सांख्यिकी संचलनालय अपर संचालक म.का. भांगे व जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांचा या चौकशी पथकात समावेश आहे.

हे पथक मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, त्याकरिता निधी वितरण याची चौकशी करुन एका आठवड्यात हा अहवाल सादर करावा असे आदेश राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी दिले आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button