देश-विदेश

भारतात डिझेल वाहने बंद होणार

डेडलाईन जाहीर

 

भारतात प्रवाशी वाहतुकीसाठी डिझेल वाहनाचा सर्वात जास्त वापर केला जातो. मात्र जगभरात ग्लोबल वार्मिंगची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. मात्र त्यावर सर्वच देश त्रस्त आहेत. त्यामुळे वाढत्या ग्लोबल वार्मिंगवर सर्व देश गांभिर्याने विचार करत आहे. तसेच ग्लोबल वार्मिंग रोखण्यासाठी देशात देखील मोदी सरकारने अनेक नवनवीन योजना केल्या आहेत.

डिझेल वाहनांमुळे प्रदूषणात वाढ :
मात्र अशातच डिझेल वाहनांमुळे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असल्याचा दावा वारंवार करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे आता केंद्र सरकारच्या खास समितीने देखील डिझेल वाहनांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. तर आता ती नेमकी शिफारस काय आहे हे आपण जाणून घेऊयात…

डिझेल वाहने बंद होणार? :
तरुण कपूर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीची स्थापना केली होती. या समितीने यासंदर्भात सावितर अभ्यास करून एक अहवाल देखील सादर केला आहे. त्यानुसार, आता भारतात 2027 पर्यंत डिझेल वाहनांवर बंदी आणण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. यासंदर्भांत केंद्र सरकारने हरित आणि स्वच्छ उर्जेवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस सुद्धा समितीने केली आहे.

त्यामुळे आता सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याची शिफारस ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने केली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप तरी ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीच्या या शिफारसी स्वीकारल्या नाहीत. तसेच यावर अधिकृतपणे काही भाष्य देखील केलेले नाही

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button