राजकारण

केज मतदार संघात ३ लाख ८७ हजार २२१ मतदार हक्क बजावणार

शेवटच्या टप्यात रंगत शिगेला

 

केजमध्ये तीन लाख ८७ हजार २२१ मतदार बजावणार हक्क राज्यात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका जोर धरत असून केज मतदार संघाच्या निवडणूक चांगलीच रंगत आली आहे. या निवडणुकीत केज मतदार संघातील ३ लाख ८७ हजार २२१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावून केज मतदारसंघाचा आमदार ठरवणार आहेत. निवडणूकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. मागील ४५ वर्षापासून

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

५९५ महिला तर ६ तृतीयपंथी अशा ३ लाख ८७ हजार २२१ मतदारांचा समावेश आहे.

केज मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघामध्ये केज व अंबाजोगाई तालुक्यातील गांवाचा तसेच बीड तालुक्यातील नेकनूर व परिसरातील गावांचा समावेश होतो. मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढत चाललेली आहे. निवडणूकीमध्ये २ लाख २ हजार ६२० पुरुष, १ लाख ८४ हजार

निवडणुकीत २५ उमेदवार सार्वत्रिक निवडणूकीस सामोरे जात आहेत. या २५ उमेदवारांचे भविष्य मतदारसंघातील ३ लाख ८७ हजार २२१ मतदार आपल्या मतदानातून २० नोव्हेंबर या मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनमध्ये बंद करणार आहेत. या निवडणुकमध्ये मतदारसंघातील ६ तृतीयपंथीय नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अंबाजोगाई शहरातील ४, मोरेवाडी १ व केज शहरातील १ असे ६ तृतीयपंथीय नागरिक इव्हीएम मशीनचे

▶ पाच हजार युवा

मतदारांचा समावेश

नवीन मतदार नोंदणी करतांना युवकांचा जास्त सहभाग वाढण्यासाठी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले होते. प्रशासनाच्या या मोहिमेमुळे १८ ते १९ वयोगटातील ५ हजार ११४ युवा मतदारांचा नव्याने समावेश झाला आहे.

बटन दाबून आपले मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होणार आहे. निवडणुकीची तयारी प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे यांनी सांगितले.

वयोवृद्ध – दिव्यांग ५० मतदारांनी केले मतदान

वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना मतदान केंद्रावर मतदान जाऊन करणे शक्य नसते. यामुळे ते मतदान करण्यापासून वंचित राहतात. यांना सधी देण्यासाठी निवडणूक आयोगाने होम वोटिंग करण्याची सोय उपलब्ध करुन दिली होती. होम वोटिंगची सोय मिळण्यासाठी अर्ज केलेल्या ५६ मतदारांपैकी २ मयत झाले. राहिलेल्या ५४ मतदारापैकी ३५ जेष्ठांनी तर १५ दिव्यांग अशा ५० मतदारांनी आपले मतदान केले असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा केजचे तहसिलदार राकेश गिड्डे यांनी सांगीतले.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button