संपादकीय

गोपिनाथराव मूंडे साहेबांचा स्मृती दिन

गोपिनाथराव मूंडे साहेबाचा परीचय

केज:-गोपीनाथ पांडुरंग मुंडे (१२ डिसेंबर१९४९ – ३ जून२०१४) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य होते. त्यांनी इ.स. १९८० पासून इ.स. २००९ पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले तसेच इ.स.२००९ पासून इ.स.२०१४ पर्यंत भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते (इ.स. २०१२). १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते.

भाजपचे सभेला गर्दी खेचणारे वक्ते व प्रबळ राजकीय पुढारी असलेले महाराष्ट्र राज्यातील नेते म्हणून त्यांची ओळख होतीे. ते महाराष्ट्राचे माजी आमदार व महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे राजकीय नेते होते. त्यांना भाजपमधील खालच्या स्तरापासून काम करणारा नेता समजले जाते. राष्ट्रीय पातळीवरही भाजपमध्ये नेते म्हणून मुंडेची ओळख होतीे. मुंडेसोबत महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी होतीे. मुंडे हे मूळचे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्याच्या नाथ्रा गावचे होते. त्यांचे घराणे राजकारणात नव्हते. तथाकथित उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम मुंडे यांनी केले, असे समजले जाते. १२ डिसेंबरइ.स. २०१० रोजी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांचा लोकनायक असा गौरव केला

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button