क्राईम

केज पोलीसाची कौतुकास्पद कामगिरी सराईत गुन्हेगार गावठी कट्यासह ताब्यात

केज शहरात बरेच गुन्हेगाराकडे गावठी कट्याच्या सुकाळ

केज:-दिनांक ०७/११/२०२४ रोजी केज पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे जुबेर मुस्ताक फारोखी याचे जवळ गावठी कट्टा असुन तो त्याचा धाक दाखवुन रोजा मोहल्ला भागात दहशत माजवत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी पोलीस स्टाफला सोबत घेवुन रोजा मोहल्ला येथे गेले असता पोलीसांना पाहुन इसम नामे जुबेर मुस्ताक फारोखी पळु लागला तेंव्हा पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्यास बसस्टँडच्या मागे पकडले असता त्याचे अंगझडती मध्ये त्याचे कमरेला एक सिल्वर रंगाचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, त्याचे मॅगझीन मध्ये 01 जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदर इसम नामे जुबेर मुस्ताक फारोखी, वय २७ वर्षे, रा. रोजा मोहल्ला केज, ता केज याचे विरुध्द पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आर्म अँक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही मा.श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, बीड, मा.श्रीमती. चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पो.ह./बाळासाहेब अहंकारे, पो अं/ प्रकाश मुंडे यांचे पथकाने केली आहे. सदर आरोपीवर यापुर्वी सुध्दा पोलीस स्टेशन केज येथे बरेच गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button