आपला जिल्हा

नक्षलग्रस्त गडचिरोलीत सेवेबद्दल पोलिस उपनिरीक्षक स्वरुपा सुंदर नाईकवाडे यांना विशेष सेवा मेडल जाहीर

 

केज :-पोलिस उपनिरिक्षक स्वरूपा सुंदर संगीता नाईकवाडे ह्या जुन २०२२ मध्ये पी एस आय ची ट्रेनिंग पुर्ण केल्यानंतर प्रथम नेमणूक त्यांना गडचिरोली येथे देण्यात आली एक महिना गडचिरोली येथे परत नक्षल विरोधी मोहिमेत काम करण्यासाठी त्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आली

एक महिन्यानंतर त्यांना धानोरा येथील पोलिस ठाणे येथे नेमणुक देण्यात आली वर्ष २०२२ ते २०२५ या तीन वर्ष्यात स्वरूपा नाईकवाडे यांनी अनेक मोहीमेत भाग घेतला अति दुर्गम भागात त्यांनी चांगले काम केले तेथील आदिवासी भागातील नागरिकांची उत्तम सेवा केली महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना अधिवासी बांधवा पर्यंत पोहचवल्या तरुणाई ला शासकीय निमशासकीय सेवेत नौकरी च्या खूप संधी आहेत त्यासाठी मार्गदर्शन शिबिरात कार्य केले पॉक्सो अंतर्गत अनेक गुन्ह्यात त्यांनी मुलींना न्याय मिळऊन देण्याचे काम केले. त्या कामी त्यांना पोलिस अधीक्षक गडचिरोली यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रही देण्यात आले

या तीन वर्ष्यातील त्याच्या चांगल्या कामा बद्दल पोलिस उपनिरिक्षक स्वरूपा नाईकवाडे यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पोलिस विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आहे  १५ ऑगस्ट रोजी त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे तीन वर्षाच्या छोट्या कालावधी मध्ये हे पदक त्यांना मिळाल्या बद्दल स्वरूपा नाईकवाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button