राजकारण

केज राखीव मतदार संघात काडी सम्राट दुकानदाराची आस्तित्वाची लढाई ?

आमदार सौ. नमिताताईचे कामच विजयी करणार..

केज:- केज राखीव मतदार संघात उमेदवाराची संख्या वाढताना दिसत आहे भाजप कडे प्रबळ दावेदार सौ.आमदार नमिताताईच तर राष्ट्रवादी कॉग्रेस (पवार गट) कडुन माजी आमदार पृथ्वीराज साठेची प्रबळ उमेदवारी मानली जाते मग शरद पवार गटाकडुन उमेदवारी मागणारे असंख्य उमेदवार हे एैनवेळी आलेले दिसतात मुंदडा परीवार यांनी तीन दशके या मतदार संघावर विविध पक्षाकडुन राज्य केलेले आहे त्या भाजप असो संघ परीवार असो राष्ट्रवादी कॉग्रेस असो की अजुन कोणतेही पक्ष यापुढे ते कधीही अवलंबुन राहीलेले नाहीत.
त्यांचे कारण म्हणजे केज मतदार संघातली स्व:ताच्या कार्यकर्त्याची मजबुत फळी ही फळी ही कोणत्याही पक्षाची नसुन स्व:कर्तुत्वाने मिळवलेले आहेत..
त्या ऊपर मतदार संघातले कोट्यवधी रुपयेचे विकास कामे रस्ते,नविन रुग्नालय इमारती, विद्युत डिपीचे मतदार संघात जाळेच निर्माण केलेले आहेत.. सभाग्रह, ग्रामीण भागात विविध नदीवर बंधारे,केज ला नगर खात्याकडुन १५० कोटीचे रस्ते,दिवंगत नेते गोपिनाथरावजी मुंडे साहेब नाट्यग्रह, ग्रामीण भागातील मागणी तेथे पांदन रस्ते ,शिवरस्ते,गायगोटे,
नरेगा मधले रस्ते असे विविध विकास कामे केलेली आहेत निवडणुका वेळी राजकारण ठीक आहे पन असे विविध कामे केलेली ही सर्व सामान्य जनता लक्षात ठेवत आसते त्यामुळे विद्यमान आमदाराना पक्ष विहरीत मुस्लिम,मराठा,ओबीसी , आठरापगड जातीचे मतदान मिळत आलेले आहे त्यामुळे भाजपचे खासदार गोपझडे साहेब किंवा इतर पक्षनेते उमेदवारी कोणाला द्यायची ती चर्चा पक्ष अंतर्गत चलत आसते पन भाजप कडे विद्यमान आमदार सोडता इतर निवडणुक जिंकणारा चेहरा दृष्टीक्षेपात तरी दिसत नाही..
सर्व सामान्य जनतेची कामे करत आसताना मतदार संघातील काही मोजके मनोनीत नेतेमंडळी आमदाराच्या (आर्थीक लाभापोटी) कार्यपध्दतीवर नाराज होऊन अंधारात काही लोकाना भडकवुन आपली दुकानदारी चालवण्यासाठी धरपडत आसतात ही दुकानदारी लोकसभा निवडणुकीत पार उघडी पडलेली आहे पन हे दुकान दार केज मतदार संघातले जेवढे ईच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे हेच ठळक पणे दिसतील कॉग्रेस कारभारी हेच,जनविकासचे कारभारी हेच,माजी आमदार संगितताई ठोंबरेचे कारभारी हेच,सौ.अंजलीताईचे कारभारी हेच.सिताताई बनसोड कारभारी हेच.गोकुळ जाधवचे कारभारी हेच.साठे साहेबाकडे हेच भाजपकडे हेच कारभारी
हे दुकान दार उमेदवार कार्यकर्ते उचकाऊन देण्यात फार पटाईत आहेत जेवढे उमेदवार जास्त तेवढे बोकेना खोके पन मिळतात  यांच्या जवळ मतदान नाही खासदार आमदार यांच्या कडे फक्त पिना करण्यात हे तरबेज आहेत या सर्व उमेदवारानी यांचा कावा ओळखुन वेळीच सावध व्हावे हे दुकानदार विश्वासाने गळा कापणारे आहेत

अन्यथा लोकसभेसारखी पश्चातापाची वेळ येईल आपल्यावर खापर कोणी फोडु नये म्हणुन ओबीसी मराठा वाद लाऊन मोकळे होणारे हेच कार्यसम्राट दुकानदार

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button