राजकारण

केजच्या भुषन खा.रजनीताई पाटील यांच्यावर पुन्हा मोठी जबाबदारी

हिमाचल आणि चंदिगड दोन राज्याची जबाबदारी


केज:- काँग्रेस पक्षात निष्ठेला महत्व आहे यांची प्रचिती पुन्हा केजच्या भूषन  काँग्रेस नेत्या खा. रजनीताई पाटील यांच्या रुपाने बीड जिल्ह्याला आली असून परवा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या जनरल सेक्रेटरी व राज्याचे प्रभारी यांची पक्षाने नावे जाहीर केली यामध्ये खा. रजनीताई पाटील यांच्यावर पुन्हा पक्षाने मोठी जबाबदारी दिली असून त्यांना हिमाचल प्रदेश व चंदिगड या दोन्ही राज्याचे प्रभारी केल्याने आता खा. रजनीताई पाटील यांना राहुल गांधी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या टीम मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर गांधी घराण्यावर असलेली निष्ठा परत कामाला आल्याची भावना याप्रसंगी व्यक्त होत आहे.

काँग्रेसच्या नेत्या खा. रजनीताई पाटील यांनी सोनिया गांधी व गांधी परिवारावर ठेवलेली निष्ठा याचेच हे फळ आहे. परवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी व राज्याचे प्रभारी यांची नावे पक्षाने जाहीर केले. यामध्ये हिमाचल प्रदेश व चंदिगड या दोन राज्याच्या प्रभारी म्हणून काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या तथा राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे सोनिया गांधी यांच्या टीम मध्ये यापूर्वी देखील रजनीताई यांनी काम पाहिले आहे व आता पुन्हा राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या टीम मध्ये देखील काम करण्याची संधी रजनीताई यांना उपलब्ध झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button