
केज :- केज राखीव मतदार संघात आमदारकीचे डोहाळे लागलेले भावी आमदार जनतेसाठी किती तळमळीने काम करणार आहेत हे पटवुन देण्यासाठी त्यांचा धरपडा उठलेला दिसत आहे त्यामधे विद्यमान आमदार व राष्ट्रवादी (शरद पवार) गट सोडता बाकीचा प्रभाव निवडणुक आल्यावरच जानवत आसतो ते पन आमदाराकीला उभे राहणार आहेत का?
ही चर्चा जनतेत चालु आहे मग यात पाच वर्ष हे जनतेला विसरुन हे काय करतात हे त्यांनाच माहीत आसते निवडणुक आल्यावरच ते मतदार संघात तळ ठोकुन आसतात काही जन फोन करुन बळेच पत्रकाराना जेवनावळी घालतात काहीजन पत्रकार परीषद घेतात काही जन पे देऊन प्रसिद्धी मिळवतात पण बाब जनतेला पटत नाही हे समजून घ्यायला कोणी तयार नाही पाच वर्ष मुंबई पुणे ला राहुन आपले व्यवहार बघत आसतात तेव्हा मतदार संघातली जनता कुठे आसते हे त्यांना माहीत आसते का?
चालु आमदार व भावी आमदार यांनी या प्रश्नाकडे बघितले आहे का जनता कोणत्या परीस्थिती मधे जिवन जगत आहे ते
सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष हे सत्तेत आले की सोईस्कर पने जनतेचे प्रश्न विसरण्यात धन्यता मानतात शेतकरी फुकट योजनेमुळे शेतात कुनाला कामगार मिळेना अन हमीभाव पन कुनी देईना
नौकरी पासुन युवक वंचीत रोजगारापासुन गरीब मजुर वंचीत
नौकरशहा रिक्त जागेमुळे कामाचा ताण तणामुळे परेशान
व्यापारी बांधव जि एस टी मुळे परेशान
करोडे लघू उद्दोग बंद पडल्यामुळे लाखो शिक्षीत तरुण परेशान
मग या राज्यात चालले तरी काय
मराठा आरक्षण मधे ओबीसी मधे भांडण लावुन धन्यता माननारा सत्ताधारी पक्ष त्यामधे मतदाराना आमिष दाखवुन लाडकी बहीन योजना लाडका भाऊ योजना महिलाना एसटी फुकट श्रावण महिना आला देवदर्शन फुकट पिवळे राशन वर गँस फुकट अन यांना मात्र सरकारी तिजोरीतुन दुसर्याचे सरकार पाडायला हजारो कोटी आमदार फोडण्यासाठी कोट्यावधी रुपये लागतात काय झाडी डोंगार एकदम झक्कास अन यांचेच फक्त ओके आहे
या राजकारणी लोकांनी राज्याची वाट लावण्यात कोणतेही कसर ठेवली नाही
मराठ्यांना आरक्षण शिक्षणासाठी ओबीसी मधूनच द्या पन राजकिय आरक्षण कधीही देऊ नका



