सामाजिक

केज तालुक्यातील अवैध धंदा बंद करा शिवसेनेचा उपोषण करण्याचा ईशारा

केज तहसिलदाराना दिले निवेदन

 

केज :-केज पोलीस स्टेशन व युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याचे जाळे फोफावत चालले आहे.गुटखा-मटका ,अवैध गो-वाहतुक,अवैध दारू विक्री, अवैध वाळु उपसा,अवैध चंदन तस्करी,अवैध ॲानलाईन गेम, अवैध गांज्या विक्री व अनेक अवैध धंद्यामुळे कित्येकांना आपला जिव गमवावा तर लागतोच या व्यसनांमुळे कित्येकांची घरे उद्वस्त झाली आहेत.
अशा व्यसनापायी अनेक जन बेघर होऊन देशोधडीला वाहुन चुकीच्या मार्गाकडे लागत आहेत, अनेक युवक अश्या व्यसनांच्या नादी लागल्याने गुन्हेगारीच्या कुठल्याही थराला जात आहेत , गुन्हेगारी वाढण्यासाठी कारणीभुत ठरणाऱ्या अवैध दारू विक्री,गुटखा,मटका अशा प्रकारच्या अवैध धंद्यावर पोलीसप्रशासणाच्या दुर्लक्षणामुळे फोफावत चाललेला हा केज पोलीस स्टेशन व युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याचा सुळसुळाट ८ दिवसात बंद करण्याच यावा,अन्यथा दि. ०८/०८/२०२४ रोजी तहसील कार्यालय केज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.
स्वाक्षरी करून निवेदन देताना केज शिवसेना तालुकाप्रमुख अशोक जाधव,जिल्हासचिव रोहित कसबे,शहरप्रमुख तात्या रोडे,युवासेना तालुकाप्रमुख किशोर घुले,उपतालुकाप्रमुख सुभाष ठोंबरे,तालुका सचिव सखाराम वायबसे,ज्ञानेश्वर बोबडे,आप्पा कांबळे,पप्पू कोल्हे,रूषी घुले,बाबासाहेब देशमुख,पुरूषोत्तम घुले, नंदकिशोर गिते,कृष्णा केदार,अंगद देशमुख सह शिवसैनिक उपस्थित होते.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button