शैक्षणिक

खासगी अनुदानित शाळांसाठी खुशखबर! शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा

संस्थाचालकाचे सोन्याचे दिवस भरतीसाठी आर्थिक घडामोडीला आला वेग

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भातील २८ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयाला न्यायालयाने दिलेली स्थगिती फेब्रुवारी २०२४ मध्ये उठवली आहे. शासनाने शैक्षणिक संस्थांमधील ३३ हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर केला आहे

आता ३० सप्टेंबर २०२३ च्या संचमान्यतेत शाळांनी भरलेल्या पटसंख्येच्या प्रमाणात ही भरती होईल.राज्यभरात अंदाजे १० हजारांपर्यंत पदांची भरती या निर्णयामुळे होवू शकते. ऑगस्टअखेर भरतीला सुरवात होवू शकते, अशी माहिती शिक्षण संचालक कार्यालयातील विश्वसनिय सूत्रांनी दिली.

२०१९च्या नंतर खासगी अनुदानित शाळांची संचमान्यता झालेली नाही. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाला काहींनी आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. स्थगिती उठल्यानंतर ३० सप्टेंबर २०२३ च्या संचमान्यतेवेळी शाळांनी भरलेली सरल पोर्टलवरील पटसंख्या तीही आधार- व्हॅलिड पटसंख्या ग्राह्य मानून शाळांनी संचमान्यतेत भरलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे त्याठिकाणी बसतात का, याची पडताळणी सध्या सुरू आहे. त्यात वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, प्रयोगशाळा परिचर, ग्रंथपाल या पदांचा समावेश आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button