क्राईम

केज मधील अट्टल गुन्हेगार उमेर उर्फ पापा मुस्ताक फारोकी याला झोपडपट्टी (mpda) दादा कायद्यानुसार केले स्थानबद्ध

खंडणी,काळाबाजार,वाळु तस्करी,भेसळ दादागिरी करणार्यावर लवकर कार्यवाही करणार

 

केज :- बीड जिह्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी बीड जिल्हा पोलीस अधिक्षक श्री नंदकुमार ठाकुर यांनी गुन्हेगाराची समुळ नष्ट करण्यासाठी बीड जिल्ह्यात कठोर पावले उचलेली आहेत त्यानुसार झोपडपट्टी या कायद्यानुसार अनेक गुन्हेगारावर कार्यवाही करण्याचे चालु केले आहे या पार्श्वभुमीवर केज पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक श्री प्रशांत महाजन यांनी दिनांक ०६/०६/२०२४ रोजी इसम नामे उमेर उर्फ पापा मुस्ताक फारोकी वय वर्ष २८ राहणार रोजामोहल्ला केज तालुका केज जिल्हा बीड यांच्या विरुद्ध झोपडपट्टी कलम अंर्तगत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक यांच्या मार्फत मा जिल्हादंडधिकारी साहेबाकडे सादर केला होता
सदर स्थानबद्ध इसामाविरुद्ध केज पोलीस स्टेशन येथे खुनाचा प्रयत्न करणे बलात्कार करणे जबरी चोरी करणे पळवुन नेणे दुखापत करणे जातीवाचक शिवीगाळ करणे घराविषयी आगळीक करणे गैरकायद्याची मंडळी जमा करणे दंगा करणे अवैध शास्त्र बाळगणे वैगरे स्वरुपाचे १२ गुन्हे पोलीस अभिलेखात दाखल आहेत त्यापैकी ०९ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत ०३ गुन्हे पोलीस तपासावर आहेत नमुद इसामावर त्यांने आपली वर्तणुक सुधारावी म्हणुन या पुर्वी (crpc) कलम ११० प्रमाणे दिनांक २१/०७/२०२३ रोजी प्रतिबंध कार्यवाही करण्यात आली होती परंतु सदर इसम हा प्रतिबंध कार्यवाहीला न जुमानता पुन्हा चढत्या क्रमाने गुन्हे चालु ठेवण्याची श्रृंखला चालुच ठेवीत होता त्यांची केज शहरात व परीसरात प्रचंड दहशत आहे त्यांच्या विरुध्द लोक फिर्याद किंवा साक्ष देण्यासाठी पुढे येण्यास धजवत नव्हते तो सर्व सामान्य लोकाना त्रास देऊन दहशत निर्माण करुन व सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा पोहचवत होता
सदर प्रकरणात श्री अविनाश पाठक जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडधिकारी बीड यांनी दिनांक १०/०७/२०२४ रोजी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने एम पी डी ए कायद्याअंतर्गत आदेश पारीत करुन सदर इसामास ताब्यात घेऊन हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे हजर करुन स्थानबद्ध करणे आदेश पारीत केले होते त्यानंतर पोलीस अधिक्षक बीड यांनी सदर इसमास तात्काळ ताब्यात घेऊन कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस स्टेशन केज व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना दिल्या होत्या त्यानंतर पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या सुचनेवरुन पोलीस उपनिरीक्षक श्री श्रीराम खटावकर व त्यांचा टिम ने सदर प्रस्तावीक इसमास दिनांक ११/०७/२०२४ रोजी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे दुपारी दिड वाजता हजर केले त्यानंतर पोलीस निरीक्षक केज यांनी दिनांक११/०७/२०२४ रोजी सदर इसमास कायदेशीररित्या ताब्यात घेऊन योग्य पोलीस बंदोबस्तात हार्सुल कारागृत छत्रपती संभाजीनगर येथे करुन स्थानबद्ध केले

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधिक्षक केज श्री कमलेस मिना पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रशांत महाजन पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील पोलीस अंमलदार मुंडे,गित्ते सर्व पोलीस स्टेशन केज तसेच उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार अभिमन्यु औताडे डि डि चव्हाण सानप,नारायण कोरडे आश्विनकुमार सुरवसे ,नेमनुक शाखा गुन्हे शाखा बीड भविष्यात ही वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवनआवश्यक वस्तुचा काळाबाजार करणारे व्यक्ती यांच्या वर व दादागिरी करणारे खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त( mpda) कायदेअंतर्गत अगामी विधानसभा निवडणुक संबंधाने कठोर कार्यवाही करण्याचे संकेत पोलीस अधिक्षक यांनी दिले आहे

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button