Uncategorized

खेडेकर ते बिर्ला, माज का लाज? भाजपचे काम करा कलेक्टर व्हा?

लोकशाहीवर संकट

११० एक्कर जमीन , ६ प्लॉट ७ प्लाट , ९०० ग्रम सोने हिरे ,ऑडी सह चार अलिशान गाड्या , दोन खाजगी कंपन्यात भागीदार , पूजा खेडकर बीडशी संबधित असलेल्या या लेकीने खोटे प्रमाणपत्र देऊन आयपीएस बनल्या म्हणे तूर्तास आरोप असला तरी त्यांनी ६ वेळा चाचणीला दिलेला नकार आणि त्यांच्या पित्याने भाजपचे काम करून लेकीला कलेक्टर बनण्याची वाट सरळ व सुरळीत केल्याचे म्हटले जात असताना , आम्ही तोंडात बोट घातलेच पाहिजे , कारण आम्ही गरिबांनी काबाड कष्ट करून लेकर शिकवायची मात्र ऐन वेळी कुणी पैसावला सत्तेतल्या पक्षाला मदत करायचा आणि लेकीला कलेक्टर करायचा .
12 th फेल चित्रपट पाहिला तेव्हा वाटले कि गरिबांच्या मेहनतीचे चीज खरच होत , होत देखील असेल विश्वास नांगरे विजय कबाडे प्रवीण मुंडे सारखे अनेक चेहरे आहेत ज्यांनी शून्य ते यश असा प्रवास केला आहे मात्र एक जागा जरी चुकीची भरली तर ती एका मेहनत घेणाऱ्या आणि गल्ली ते दिल्ली सिद्ध झालेल्या एका उमेदवाराच्या कष्ट आणि आयुष्यावरचा अन्याय ठरतो आणि , सर्वाधिक विश्वास असलेली परीक्षा संशयात येते हे वेगळेच .पूजा खेडकर हि श्रीमंत बापाची मुलगी चुकीचे प्रमाणपत्र घेऊन जेव्हा आयपीएस होत असेल तेव्हा ती एका अश्या मुलाचे आयुष्य बरबाद करते ज्याने आयुष्यात कष्टाने गुणवत्ता मिळवलेली असते , ओम बिर्ला हा भाजप नेत्याची पोट्टी केवळ त्यांची मुलगी म्हणून जर थेट आयएएस होणार असेल तर गरिबांनी हातात पेनच घ्यावा का आणखी काही .
डॉक्टर पूजा खेडकर आपण अजून अंधत्व असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन युपीएससी परीक्षा पास केली आहे.विशेष म्हणजे या आधी तीने अपंगत्व गट अ (१ निम्न अपंगत्व) श्रेणी मधुन २०१९ मध्ये UPSC पास केली होती.२०२२ मध्ये मात्र अपंगत्वामध्ये रातोरात वाढ झाली .अपंगत्वाचे गट १ श्रेणी एक मधून पास होऊन २०२२ मध्ये अपंगत्व गट ५ श्रेणी मध्ये आली.म्हणजेच अंधत्वा सोबत इतरही अपंगत्व आहेत.त्याशिवाय तिच्या बापाची एकूण मालमत्ता चाळीस कोटी दाखवलेली आहे.मात्र हिच्या अर्जामध्ये याच उत्पन्न 0 रुपये दाखवलेला आहे आणि म्हणून हिला ओबीसी क्रीमिलेयर सर्टिफिकेट देण्यात देखील आलं. लक्षात ठेवा पूजा खेडकर ही एमबीबीएस डॉक्टर असून नऊ वर्षातील काम देखील .केलेला आहे. तरीही तिचं उत्पन्न ० रुपये.तिच्या वडिलांनी वंचितच्या पक्षाद्वारे निवडणूक देखील लढवली आहे. तिची आई पाथर्डी तालुक्यात तिची आई तिची आई अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावात सरपंच देखील राहिलेली आहे. तिचे आजोबा देखील सनदी अधिकारी होते.अनेक स्पर्धा परीक्षा कार्यकर्त्यांनी आरटीओ दाखल करून कारवाईची मागणी देखील केलेली आहे. पण राजकीय पक्ष आणि नोकरशाही याच्याशी तगडं नेटवर्क असणारे या कुटुंबाचं कोणीही वाकडं करू शकेल असं वाटत नाही. पण यातून यूपीएससीच्या भंगार कारभार उघड होतो. विशेष म्हणजे इथिक्सच्या पेपरमध्ये हिला १३८ गुण मिळालेले आहेत.
मात्र वास्तविक जीवनात अशाच मूल्यांना पादळी तुरवण्यात पायतळी तुडविण्यात ही मंडळी मागे नसतात. काल त्यांच्या आईने दार उघडताना चांगलेच संस्कार दाखवले म्हणे .
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची कन्या आयएएस अधिकारी अंजली बिर्ला सध्या चर्चेत आहेत. त्यांनी पहिल्याच टप्प्यात युपीएससी परीक्षा पास केली होती. सध्या त्या रेल्वे मंत्रालयात कार्यरत आहेत. परंतु, त्यांची ही आयएएस पदवी वादग्रस्त ठरली आहे. ओम बिर्ला यांच्या राजकीय वरदहस्तामुळे त्या पहिल्याच टप्प्यात परीक्षा पास होऊ शकल्या असा आरोप होता . राजस्थान मधील विरोधी पक्ष नेते दिलीप कटोरिया यांनी सभागृहात कोचिंग क्लासेस वर बोलताना गुणवत्ता कशी विकत घेतली जाते हे सांगितले जर असे असेल तर गरिबांनी शिकायची कि नाही . मार्क पैश्यावर मिळतात हि गोष्टच अवघड आहे . आमदार केटेरीया सभागृहात ढसा ढसा रडले . नखरे करणारी पूजा खेडकर पासून ते पैश्या वाल्या बापांची पोर जर कलेक्टर बनतील तर जे गरिबांच्या मानगुटीवर बसून अधिकारी बनतील ते काय गरीबांचा कारभार करणार आहेत ? पूजा खेडकर यांनी चुकीची माहिती देऊन आरक्षणाचा फायदा घेतला असल्यास, ते अंत्यत गैर आहे. असे रामदास आठवले म्हटले आहेत . शिक्षण क्षेत्रात धनवान बापानी गुणवत्ता विकत घ्यायला सुरु केली तर आमच्या शिक्षण प्रणालीचे नाही तर आमच्या व्यवस्थेची वाताहत आम्हाला पहावी लागेल . कलेक्टर मध्ये जो समाज न्यायदंडाधिकारी पाहतो कुणास ठाऊक लोक कलेक्टर आला कि म्हणतील आल रे पैश्यावर झालेले कलेक्टर ….?

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button