क्राईम

केज मधील व्यापारी बांधवानी रोडवरच्या नालीचा गॅप भरुन घ्यावा पोलीस निरिक्षक वैभव पाटील

या बेशिस्त वाहनाला लवकरच लगाम घालणार

केज :-केज शहरातुन दोन महामार्ग आहेत १)अहमदपुर-मांजरसुभा
२)शेगाव -पंढरपुर
या महामार्गामुळे केज शहरात प्रचंड वाहतुक वाढलेली आहे अन एच. पि. एम. कंपनीने मोठ्या प्रतिक्षेनंतर दोन्ही बाजुने नाली केले ते ही जनतेच्या मुळावर रोड मधे अन नाली कामात सहा इंचाचा गॅप झालेला आहे त्यामुळे विविध दुकानात खरेदी करताना रस्त्यावरच मोटार सायकल किंवा चारचाकी वाहने रोडवरच दिसुन येतात केज च्या नदीवरचा पुल ते छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यत वाहतुकीची कोंडी रोजच होते त्यामुळे या रस्त्याची जवाबदारी कंपनी घेते ना सार्वजनिक बांधकाम विभाग ना नगरपंचायत मग या रस्त्याचा वाली कोन आहे हे अनउत्तरीत प्रश्न आहे तरी महामार्गावरच्या केलेली नाल्या अन त्यावरचा गॅप व्यापारी बांधवानी आप आपल्या दुकानासमोरचा गॅप भरुन काढा जेनेकरुन खरेदीसाठी आलेले ग्राहकांची मोटारसायकल नालीवर लावल्या जातील असे पोलीस निरिक्षक वैभव पाटील यांनी सांगितले आहे जर वाहतुकीस अरथळा निर्माण झाल्यावर नियमानुसार रोड वरच्या वाहनावर दंड आकारला जाईल असे म्हटले आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button