राजकारण
आमदार बाळासाहेब आजबे व माजी आमदार भिमराव धोंडे यांना पंकजाताईचा प्रचार पडला महागात
आष्टीच्या सभेत आष्टी पाटोदा विधानसभेसाठी सूरेश घस यांच्या नावाची उपमूख्यमंत्री देवेंद्र फडविसानी केली घोषणा
बीड लोकसभेच्या प्रचारासाठी काल आष्टी येथे राज्याचे व भाजपचे उपमूख्यमंत्री देवेंद्र फडनविस यांनी येत्या विधानसभेसाठी आष्टी पाटोदा मतदार संघासाठी आमदार सूरेश आन्ना धस यांच्या नावाची घोषणा करून आमदार बाळासाहेब आजबे व माजी आमदार भिमराव धोंडे यांची गोची करून टाकली आता आष्टी पाटोदा मतदार संघातून जर लिड मिळाली तर त्यांचे श्रेय सूरेश आन्ना धस यांनाच जाणार हे निश्चित आहे पन भाजपच्या विजयासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आमदार बाळासाहेब आजबे व माजी आमदार भिमराव धोंडे यांना पंकजताईचा प्रचार महागात पडल्याचे चित्र दिसत आहेत
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यात तळ ठोकून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केल्यामूळे भाजपची डोकेदूखी वाढवली



